Ravikant Tupkar:''मुख्यमंत्र्यांचा सरपंच झालाय,त्यांनी...''; तुरुंगातून बाहेर येताच तुपकरांचा शिंदेंवर घणाघात

Maharashtra Politics: गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama
Published on
Updated on

Ravikant Tupkar On Eknath Shinde : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, तुरुंगातून बाहेर येताच तुपकर यांनी थेट मुख्यमंत्रई एकनाथ शिंदे यांच्यावरच हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा सरपंच झालाय अशी बोचरी टीका देखील केली आहे.

रविकांत तुपकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर बुलढाणा न्यायालयाने तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना जामीन मंजूर केला होता. तुपकर आणि त्यांचे सहकारी बुलढाण्यात दाखल झाले.यावेळी त्यांचं फटाके फोडत, अंगावर फुलांचा वर्षाव करत आणि घोषणा देत जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. तुपकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा सरपंच झालाय. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लावतो. नालीत पाणी गेले की फोन लाव, तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात. आपले मुख्यमंत्री तर ठाणेदारालाही फोन लावतात.

आमच्यावर केलेला लाठीचार्ज हा...

आपला महाराष्ट्र हा शाहू, फुले आंबेडकर, आणि छत्रपती शिवरायांचा आहे. मुख्यमंत्रीपदाची एक गरिमा आहे. पण ती गरिमाच शिंदे यांनी राखली नाही असा हल्लाबोल तुपकर यांनी यावेळी केला आहे. उठसूठ कुणालाही फोन करत असतात. आमदार, खासदारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही फोन केला तरी मुख्यमंत्री सुसाट सुटतात. पण पोलिसांनी आमच्यावर केलेला लाठीचार्ज हा बॉसच्या सांगण्यावरून केला असा आरोपही त्यांनी केला.

Ravikant Tupkar
Election in India : निवडणुकांमध्ये इस्त्रायली हॅकर्सचा वापर केला का? काँग्रेसच्या थेट प्रश्नावर भाजपचे मौन

तुपकर म्हणाले, जनरल डायरला लाजवेल अशाप्रकारचा लाठीचार्ज त्यावेळी करण्यात आला.. पण त्यांचा त्यात काही दोष नाही. त्यांचा बॉस सांगेल तसं ते वागतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुत्र्याला दगड मारला तर कुत्रं दगडाला डसतं. पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला नाहीतर ज्यानं दगड भिरकावलाय त्याच्यावर हल्ला केल्याशिवाय राहत नाही. आणि हा तुपकर वाघ आहे असंही ते म्हणाले.

Ravikant Tupkar
BJP :'मुस्लिम वोट बँक' साठी भाजप सूफी-संतांच्या चरणी..; लोकसभेसाठी असा आहे मास्टर प्लॅन

गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरां(Ravikant Tupkar)च्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटलं होतं.

त्या टीकेला प्रत्युत्तर देताना तुपकर म्हणाले, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्या ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये. योग्यवेळी तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही तुपकर यांनी गुलाबराव पाटलांना दिला. तसेच गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com