Suresh Dhas : 'जय-वीरू' एकच; आमदार धस यांनी धनंजय मुंडे-वाल्मिक कराडबरोबरच पंकजा मुंडेंवर साधला निशाणा

BJP MLA Suresh Dhas Pankaja Munde Dhananjay Munde Legislature Santosh Deshmukh Murder Case in Beed : मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात संतोष देशमुख हत्याप्रकरणात आवाज का उठवला नाही, यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मंत्री धनंजय मुंडे अन् त्यांची बहीण मंत्री पंकजा मुंडे यांनी याप्रकरणी विधानसभेत आवाज उठवला नाही, यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी खोचक टोला लगावला.

"वाल्मिक कराड म्हणजे, धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड, एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी कॉइन नव्हता का उछळला होता, तो हाच कॉइन आहे. जय अन् वीरू एकच आहे", असा टोला सुरेश धस यांनी लगावला.

भाजप (BJP) आमदार सुरेश धस म्हणाले, "संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये निघालेला मोर्चा अतिअभूतपूर्व, असा झाला. लोकांच्या मनातील राग व्यक्त करण्यासाठी लोकांनी मोर्चात सहभागी झाले होते. कोणाला बोलावलं नव्हते. लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. अनेकांची गैरसोय झाली. तरी लोक मोर्चात आले".

Suresh Dhas
Dinvishesh 29 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोपीची संपत्ती जप्त करण्याच्या आदेशावर नाराज आहेत. यावर सुरेश धस म्हणाले, "धनंजय देशमुख लहान आहेत. त्या लेकराला काही माहीत नाही. ही कायद्यातील तरतूद आहे. प्रॉपर्टी अटॅच केली की, आपोआपच आरोपी मिळून येतात. या घटनेत मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या गोष्टी सकारात्मकपद्धतीने घेतल्या आहेत". या हत्येतील आरोपींच्या शोधासाठी खंडणी, 'मोकाका', संपत्ती जप्त, दहा लाख रुपयांची मदत, अशा सर्व गोष्टी मुख्यमंत्रीसाहेबांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व निर्णय मुख्यमंत्र्यांनी वेगाने घेतले आहे. असे निर्णय घ्यायला सहा महिने-वर्षे लागतात. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचे मी अभिनंदन करतो, असेही सुरेश धस यांनी म्हटले.

Suresh Dhas
Anjali Damaniya : बीडमधील स्फोटक माहिती, व्हिडीओ कोण पुरवतंय; अंजली दमानियांनी दिले 'हे' उत्तर

मुंडे बंधू-भगिनीने आवाज उठवले नसल्यावर धनंजय देशमुख नाराज आहेत. यावर सुरेश धस म्हणाले, "पंकजाताई या विधानपरिषद सदस्य आहे. त्यांना मंत्रीपद मिळाले आहे. धनंजय मुंडे हे पण मंत्री झाले आहेत. आरोपी आहेत ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहे. म्हणेजच, त्यांच्या संबंधित आहे. रोजचे घरातील आहे. ते काय आवाज उठवणार? ते पाठिशीच घालणार. अजूनही मला वाटतं, हे लोक कसे सापडणार नाही, याचाच प्रयत्न करत आहेत. पंकजाताई सभागृहात आवाज उठवू शकणार नाही, कारण त्या विधानपरिषदेत आहेत".

"परंतु, पंकजाताईंना माध्यमांसमोर येऊन बोलायला पाहिजे होते. झालेले आहे, ते फार वाईट झालं आहे. ते बोलायला पाहिजे होते. ते त्यांचे काम होते. ते त्यांनी केलेले नाही. धनंजय मुंडे त्यांना पाठीशी घालत आहे. वाल्मिक कराड म्हणजे, धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड, एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी कॉइन नव्हता का उछळला होता, तो हाच कॉइन आहे. हा तोच आहे. जय अन् वीरू एकच आहे", असा टोला सुरेश धस यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com