AIMIM Marathwada News : `एमआयएम`मध्ये बंड ? गफ्फार कादरींनी तोंड उघडले..

Rebellion in MIM? Ghaffar Qadri accused Owaisi, Imtiaz Jalil : या बैठकीत बरीच वादळी चर्चा झाली, याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गफ्फार कादरी यांनी बंड केले, किंवा पक्ष सोडला तर त्याचा एमआयएमला किती फरक पडेल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.
AIMIM Political News
AIMIM Political NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM Political News : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत कमबॅक करण्याच्या तयारीत असलेल्या एमआयएमला छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. संभाजीनगर पुर्व विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये निवडणूक लढवलेले एमआयएमचे स्थानिक नेते डाॅ. गफ्फार कादरी सध्या अस्वस्थ आहेत. पक्षात इम्तियाज जलील यांच्या शब्दाला असलेला मान, ओवेसींकडून दिले जाणारे झुकते माप आणि जिल्ह्यासह संपुर्ण राज्याच्या निर्णय प्रक्रियेत प्रदेशाध्यक्ष म्हणून इम्तियाज यांचाच आवाज चालतो.

पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी हे संभाजीनगरात आले की इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांच्याच निवासस्थान, कार्यालयाला भेटी देतात. पक्षा संबंधीच्या सगळ्या बैठका, महत्वाचे निर्णय तिथेच घेतले जातात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने राज्यातील पाच उमेदवार जाहीर केले, त्यात संभाजीनगरचा उल्लेख झाला. इम्तियाज जलील हे विधानसभा लढवणार हे ही स्पष्ट झाले. पण त्यांचा मतदारसंघ कोणता? याचा सस्पेंस कायम ठेवत डाॅ. गफ्फार कादरी यांची कोंडी करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर इम्तियाज जलील हे पुर्व मधून लढणार, अशी चर्चा एमआयएमच्या वर्तुळात जोरात सुरू आहे. अशावेळी कादरी यांची अस्वस्थता अधिकच वाढणे स्वाभाविक आहे. एमआयएमच्या स्थापनेपासून जिल्ह्यात इम्तियाज जलील आणि गफ्फार कादरी यांचे दोन वेगळे गट होते हे काही लपून राहिलेले नाही. ऐकमेकांवर आरोप, टीका भ्रष्टाचाराचे जाहीर कार्यक्रमांमधून आरोप या सगळ्या गोष्टी घडल्या. मात्र याचा मोठा स्फोट होऊ दिला गेला नाही.

AIMIM Political News
Imtiaz Jaleel News : इम्तियाज जलील यांचे निवडणुक आयोगाला पत्र, ही केली मागणी..

इम्तियाज जलील 2014 मध्ये मध्य मधून विजयी झाले. तर 2019 मध्ये त्यांना थेट लोकसभेसाठी प्रमोट करण्यात आले. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत ते खासदार झाले आणि पक्षात त्यांचे वजनही वाढले. (Aimim) या उलट 2014 मध्ये पुर्व मतदारसंघातून गफ्फार कादरी अवघ्या 4 हजार दोनशे, तर 2019 मध्ये दुसऱ्यांदा 13 हजार 930 मतांनी पराभूत झाले. निवडणुकीत यश मिळत नव्हते, तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांचे वाढते वर्चस्व त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना खूपत होते.

त्यामुळे फक्त ओवेसी शहरात आले की कादरी आणि त्यांचे समर्थक दिसायचे. इतरवेळी पक्षाच्या कुठल्याही आंदोलन, कार्यक्रमात ही मंडळी दिसत नव्हती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही गफ्फार कादरी यांच्या भूमिकेवरून संशय व्यक्त केला गेला. पक्षाचे काम त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी केले नाही, असा आरोप इम्तियाज समर्थकांकडून केला जातो. तशी तक्रारच ओवेसी यांच्याकडे अहवालाच्या स्वरुपात करण्यात आल्याचे बोलले जाते.

AIMIM Political News
AIMIM News : ओवेसी संभाजीनगरात, आज घेणार मोठा निर्णय..

मात्र हा आरोप कादरी फेटाळून लावतात. कारण पुर्व मतदारसंघातून इम्तियाज जलील यांना सर्वाधिक लीड असल्याचा त्यांचा दावा आहे. ओवेसी यांनी संभाजीनगरात येऊन इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीची घोषणा करतांना मतदारसंघ सांगितला नाही, तिथूनच कादरी वेगळा विचार करू लागले, याची जाणीव होऊ लागली होती. अखेर काल त्यांनी आपल्या समर्थकांची रात्री उशीरा बैठक बोलावली.

या बैठकीत बरीच वादळी चर्चा झाली, याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गफ्फार कादरी यांनी बंड केले, किंवा पक्ष सोडला तर त्याचा एमआयएमला किती फरक पडेल हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. तर इम्तियाज जलील यांच्या समर्थकांसाठी कादरी यांनी बाहेर पडणे म्हणजे सुंठे वाचून खोकला गेला, असेच म्हणावे लागेल.

AIMIM Political News
Marathwada Railway News : रेल्वे प्रश्नांना आता वाली कोण ? नवनिर्वाचित खासदारांची बैठकीकडे पाठ

कादरींचे गंभीर आरोप..

विधानसभा निवडणुकीपुर्वी काय निर्णय घ्यायचा? यासाठी बोलावलेल्या बैठकीत गप्फार कादरी यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष ओवेसी हे आपल्या वेळ देत नाही, पाठवलेल्या पत्राला उत्तर देत नाही. आपण पक्षासाठी पैसा आणि वेळ घालवला, पण त्याचे फळ असे मिळत आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. हैदराबाद येथे गेलो तरीही ओवेसींनी पाच मिनिटे चर्चा करण्यासाठी वेळ दिला नाही, सर्व निर्णय इम्तियाज जलील घेत असतील तर आम्ही काय करायचे?

पूर्व विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो एवढी मेहनत आम्ही येथे केली आहे. पण अतुल सावे यांना छूपा पाठिंबा देऊन नवखा उमेदवार द्यायचा का ? असा सवाल कादरी यांनी केला. इम्तियाज जलील हे विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे फोन एका रिंगमध्ये उचलतात, पण पक्षाचे कार्यकर्ते किंवा आमचा फोन उचलत नाहीत, असा आरोप कादरी यांनी बैठकीत केला. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून वेगळा विचार करावा लागेल. पूर्व विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना मदत केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com