Sanjay Shirsat News : सटकली की आपण कुणाच्या बापाचं ऐकत नाही! संजय शिरसाटांनी कोणाचा गेम केला..

Minister Sanjay Shirsat takes aim at Abdul Sattar, highlighting the game he played and the understanding that followed. : दुसऱ्यांदा शिरसाट यांच्या मार्गात सत्तार यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. महायुती सरकारमध्ये अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद गेले आणि शिरसाट यांच्या गळ्यात पडले.
Sanjay Shirsat- Raosaheb Danve and Abdul Sattar News
Sanjay Shirsat- Raosaheb Danve and Abdul Sattar NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : आधी आम्हाला पालकमंत्र्यांच्या गाडीला हात लावता येत नव्हता. मात्र आम्ही आता त्या गाडीत बसलो आहोत. माझा गेम करायला निघालेल्यांचा कसा गेम केला? जे समजंत नाही त्यालाच राजकारण म्हणतात. आम्ही जे केलंय ते ज्यांना समजायला हवं होतं त्यांना समजले आहे, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना नाव न घेताल टोला लगावला.

मला सिक्सर मारायचा होता आणि मला वाटतं तो मी मारला आहे, असेही (Sanjay Shirsat) शिरसाट म्हणाले. जिल्ह्याच्या राजकारणात विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सत्तार यांच्यामुळेच शिरसाट यांचे मंत्रीपद हुकले होते.

दुसऱ्यांदा शिरसाट यांच्या मार्गात सत्तार यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. महायुती सरकारमध्ये (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद गेले आणि शिरसाट यांच्या गळ्यात पडले. एवढेच नाही तर जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्नही पूर्ण झाले. आता संजय शिरसाट प्रत्येक गोष्टीचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत आहेत.

Sanjay Shirsat- Raosaheb Danve and Abdul Sattar News
Abdul Sattar News : पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! अब्दुल सत्तारांची गुगली की निर्णय?

आपली सटकली की आपण कुणाच्या बापाला ऐकत नाही, कसा गेम केला असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांना डिवचले. एवढेच नाही तर भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड खरचं पाकिस्तान झाले आहे, याचा पुनरुच्चार केला. यावर आपण लवकरच सिल्लोडला जाऊन तेथील परिस्थिती पाहणार आहोत.

Sanjay Shirsat- Raosaheb Danve and Abdul Sattar News
Raosaheb Danve News : थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय; रावसाहेब दानवे म्हणतात, पक्षाने संधी दिली तर 2029 मध्ये लोकसभा लढवणार!

रावसाहेब दानवे यांनी सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकायला हव्यात. त्यानंतर पाकिस्तानातून आलेले किंवा बांगलादेशी असतील तर त्यांना बाहेर काढणे सोपे जाईल, असा चिमटाही शिरसाट यांनी त्यांच्या विधानाचा दाखला देत काढला. छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मार्चच्या अखेरपर्यंत पाणी देण्याचं वचन पूर्ण करतो. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना डेड लाईन दिली आहे, असेही शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com