Beed News : बीड कारागृहातील धर्म परिवर्तनासाठी दबावाच्या तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी होणार!

Religious conversion pressure in jail complaint in beed :अमोल चोगथियो भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण या कैद्यांनी धर्मातंरासाठी दबावाची तक्रार केली आहे.
Beed District Jail Religious conversion pressure News
Beed District Jail Religious conversion pressure NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. बीड जिल्हा कारागृहात धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याची तक्रार दाखल होताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  2. प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून कारागृह अधिक्षक यांना खुलासा मागितला आहे.

  3. या घटनेमुळे बीडमध्ये जेल प्रशासनाविरोधात रोष वाढला आहे.

Beed District Jail News : बीडच्या जिल्हा कारागृहात अधिक्षक पेट्रस जोसफ गायकवाड हे बंद्यावर जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव आणत असल्याचा आरोप झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. दोन हिंदू आणि एका मुस्लिम कैद्याने धर्मांतरासाठी दबाव आणल्याची तक्रार कैद्याचे वकील राहूल आघाव यांच्याकडे केली होती. धर्मांतरासाठी आपला मानसिक आणि शारिरीक छळ केला जात असल्याचा आरोप या कैद्यांनी लेखी तक्रारीत केला. आघाव यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात गायकवाड यांच्याविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाचा वाद आता चांगलाच पेटला असून आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याचे सांगितले. कारागृह अधिक्षक गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम यांची मुर्ती हटवून जेलमधील भिंतीवर धर्मपरिवर्तनासाठी बायबलमधील स्लोगन लिहल्याचा आरोप केला होता. जेल अधिक्षक गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी पडळकर यांनी आपल्या तक्रारीत केली होती. अमोल चोगथियो भावले, महेश नामदेव रोडे आणि मोहसिन सरदार पठाण या कैद्यांनी धर्मातंरासाठी दबावाची तक्रार केली आहे.

यावर संपूर्ण आरोप व तक्रारीची कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांनी वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल. वस्तुस्थिती तपासण्यासाठी पथक पाठवून जेल अधीक्षक गायकवाड यांच्याकडूनही खुलासा घेतला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, कारागृह अधिक्षत पेट्रस गायकवाड यांनी मात्र सगळे आरोप फेटाळले आहेत. बीड (Beed News)जिल्हा कारागृहात धर्मातरासाठी कैद्यांवर दबाव टाकला जात आहे. त्यांना विविध अमिषे दाखवली जात असल्याचा आरोप अॅड. राहूल आघाव यांनी पत्रकार परिषदेत केला.

Beed District Jail Religious conversion pressure News
Beed News : वाल्मिक कराडच्या नावाने संघटना; स्कॅनरवरून पैसेही गोळा, तांदळेंचा खुलासा तो मी नव्हेच!

आपले अशिल असलेले अमोल भावले, महेश रोडे, मोहसीन पठाण हे तिघे बंदी असताना त्यांच्याबाबत घडलेल्या प्रकारांची त्यांनी कारागृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मेलवर तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला. कारागृहातील विविध संत महंतांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलचे वाक्य लिहल्याचा आरोप आघाव यांनी केला. धर्मांतर करणाऱ्यांना दोषमुक्त करु, असे अमिष आणि जेवणातून विषबाधा करुन मारण्याची धमकीही अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Beed District Jail Religious conversion pressure News
Beed Jail Gang War Update : वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात ट्विस्ट, महादेव गितेने सांगितलं काय घडलं? सीसीटिव्ही ठरणार मोठा पुरावा!

श्रावणात शाबू खिचडी, तर ईदला खीर वाटप..

तर या आरोपांबाबत कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी हे आरोप निराधार असल्याचे सांगत फेटाळले. आमच्या मॅन्युअलमध्येच मानवतावाद असून प्रशिक्षणापासून त्याची शिकवण असल्याचे त्यांनी नमूद केले. बीड कारागृहाच्या इतिहासात पहिल्यांदा श्रावण महिन्यात सोमवारी उपवास धरणाऱ्या अडीचशे बंद्यांना शाबू खिचडी सुरु केली. त्यासाठी वरिष्ठांकडून परवानगी मिळविली.

नवरात्राच्या उपवासातही उपवासाची खिचडी सुरु केली. इदला खिर वाटप तर राखी पोर्णिमेला अडीचशे बंद्यांना राख्या बांधल्या. स्तनदा माता असलेल्या महिला बंद्यांचे बालसंगोपन योजनेतून मानधन सुरू करण्याचे प्रस्ताव आणि दिव्यांग कैद्याला कृत्रिम पाय बसवून दिल्याचे पेट्रस गायकवाड यांनी सांगीतले. सर्व बंद्यांच्या मेडीकल टेस्टही केल्याचे सांगत गायकवाड यांनी सगळे आरोप फेटाळले.

FAQs

1. ही तक्रार कोठे दाखल करण्यात आली आहे?
ही तक्रार बीड कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्याकडे करण्यात आली आहे.

2. नेमका आरोप काय आहे?
तक्रारीनुसार, कारागृह अधिक्षकांनी तीन कैद्यांना धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.

3. पोलिसांनी काय कारवाई केली आहे?
कारागृह अधिक्षकांची चौकशी करून खुलासा मागवण्यात येणार आहे.

4. या घटनेमुळे परिस्थिती कशी आहे?
घटनेनंतर बीडमध्ये कारागृह प्रशासनाविरोधात संतापाचे वातावरण आहे.

5. यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत का?
होय, काही महिन्यांपूर्वीही महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com