Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांची ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सकडे तक्रार करणार! कारवाई न झाल्यास कोर्टात धाव!

AIMIM MP Imtiaz Jaleel has warned that if no action is taken against Sanjay Shirsat, he will escalate the matter by filing complaints with the ED, CBI, and Income Tax Department. : माझ्या घरावर शेणफेक करण्यासाठी भाडोत्री लोकं आणली, आता खोटे अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल केले जात आहेत.
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मी कोणाच्या सांगण्यावरून काम करतो आहे, माझा बोलता धनी दुसराच आहे, हे सांगण्यापेक्षा आरोपांवर बोलावे. मला कायदेशीर नोटीस पाठवण्याची भाषा तुम्ही करत आहात, मी त्याचीच वाट पहात आहे, एकदा नोटीस पाठवाच, असे म्हणत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांना आव्हान दिले. अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर इम्तियाज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. संजय शिरसाट यांच्या बेकायदेशीर मालमत्ता, सरकारी जमीन, एमआयडीसीचा भूखंड आणि प्लाॅट संदर्भात आपण लेखी पुराव्यासह सगळी माहिती माध्यमांना दिली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही ती प्रत्यक्ष भेटून दिली. आता मुख्यमंत्री, राज्यपालांना ती मला द्यायची आहेत, पण मला त्यांची भेट मिळत नाहीये. एका माजी खासदाराला मुख्यमंत्री, राज्यपाल भेट देत नाही यावरून सरकार हे प्रकरण किती गांभीर्याने घेईल हे सांगता येत नाही. सरकारने दखल घेतली नाही तर आपण ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स विभागाकडे जाऊ. तिथेही न्याय मिळाला नाही, तर कोर्टात जाण्याचा आपला मार्ग मोकळा असेल, असा इशारा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला.

माझ्या घरावर शेणफेक करण्यासाठी जालन्याहून भाडोत्री लोकं आणली, आता पोलीस स्टेशनसमोर कार्यकर्त्यांना बोंबा मारायला लावून खोटे अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. पण मी अशा षडयंत्राला घाबरणार नाही. धमक्या, खोटे गुन्हे दाखल करून मला रोखता येईल, असे जर शिरसाट यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. हे सगळं करण्यापेक्षा शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माझ्या आरोपांना समोर येऊन उत्तर द्यावे. त्यांना बोलायला वेळ का लागत आहे? असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel-Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या राजकीय दबावामुळेच माझ्यावर ॲट्रॉसिटी! कोर्टात खेचणार..

मी कोणाच्या सांगण्यावरून आरोप करत आहे, असं शिरसाट म्हणत असतील तर लोकांचा माझ्यावर किती विश्वास आहे, हेच यावरून सिद्ध होते. इम्तियाज जलील मॅनेज होणार नाही, घाबरणार नाही हा विश्वास लोकांना आहे, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहेच. पण संजय शिरसाट यांच्यावर सरकार काय कारवाई करते?

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप हलक्यात घेतले; म्हणाले काहीही होणार नाही!

मी केलेले आरोप, दिलेले पुरावे यावर सरकारची भूमिका नेमकी काय आहे? याची काही दिवस आपण वाट पाहू. सरकारने काहीच कारवाई केली नाही तर संजय शिरसाट यांच्या बेकायदा मालमत्ता खरेदीचे सगळे पुरावे ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स विभागाला पाठवले जातील. तिथेही काही झाले नाही, तर मग हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाऊ आणि न्याय मागू, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com