बीड जिल्ह्यात नगर पंचायतींसाठी नेत्यांची प्रतिष्ठा; सर्वाधिक चुरस आष्टी मतदारसंघात

केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व वडवणी या पाच नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
Dhas-Dhonde-Sonawane-Patil
Dhas-Dhonde-Sonawane-PatilSarkarnama
Published on
Updated on

बीड : राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान तर; २२ रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये बीड (Beed District) जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींचा समावेश आहे. या निमित्ताने सर्वच पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सर्वाधिक चुरस आष्टी मतदार संघात पहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील तीन नगर पंचायतींच्या निवडणुका असून निवडणुकांची सुरुवातच पक्षांतर्गत गटबाजीने होणार आहे.

केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व वडवणी या पाच नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या नगरपंचायतींच्या मुदती यापूर्वीच संपल्या असल्या तरी कोरोनामुळे निवडणुका लांबल्या होत्या. सध्या या नगरपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आता सर्वच निवडणुका सुरु झाल्या आहेत.

Dhas-Dhonde-Sonawane-Patil
मोठी बातमी : 105 नगरपंचायतींसाठी निवडणुकीची घोषणा; आचारसंहिता लागू

निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील पाच पैकी आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार या तीन नगर पंचायती आष्टी - पाटोदा - शिरूर कासार मतदार संघातील आहेत. मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढताना आमदार सुरेश धस यांनी या नगर पंचायतींवर प्राबल्य मिळविले होते. त्यांच्या भाजप एंट्रीनंतरही त्यांचेच प्राबल्य अधिक आहे. मात्र, आताच्या निवडणुकीत भाजपमध्येच आमदार सुरेश धस व माजी आमदार भीमराव धोंडे यांचे स्वतंत्र गट आहेत.

त्यामुळे निवडणुकीची सुत्रे कोणाच्या हाती आणि उमेदवाऱ्या कोणाच्या समर्थकांना हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माहेबूब शेख यांच्यासाठीही या मतदार संघातील नगर पंचायतींमध्ये यश मिळविणे प्रतिष्ठेचे आहे.

राज्यात महाविकास आघाडी असली तरी या तीन नगरपंचायतीत महाविकास आघाडीतील शिवसेना व काँग्रेसला कोण सोबतीला घेणार की स्वतंत्र लढल्यानंतर काय तयारी हेही महत्वाचे आहे. शिवसंग्रामही या भागात तयारी करत असले तरी निवडणुकीच्या मैदानात किती ताकदीने उतरणार हे पहावे लागणार आहे.

केजमध्ये मागच्या वेळी काँग्रेसने काठावर सत्ता मिळविली होती. आताही पक्षाच्या हिमाचल व जम्मू काश्मीर प्रभारी रजनी पाटील यांना नुकतीच राज्यसभेवर संधी मिळाल्याने त्यांच्यासाठी देखील निवडणूक महत्वाची आहे. मतदार संघावर भाजप आमदार नमिता मुंदडा प्रतिनिधित्व करत असल्याने आणि भाजप नेते रमेशराव आडसकर यांचे होमपीच असल्याने भाजपसाठी देखील निवडणूक महत्वाची आहे.

Dhas-Dhonde-Sonawane-Patil
सोमय्यांनी आरोप करताच माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांचेही हे होमपीच असल्याने त्यांची खेळी आणि हारून इनामदार व शिववसेना देखील या ठिकाणी तयारी करत आहे. तसेच शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनीही केजमध्ये लक्ष घातले आहे.

आता निवडणुकीच्या मैदानात त्यांचा पक्ष कसा उतरतो हे महत्वाचे आहे. वडवणी नगरपंचायतीत भाजपचे राजाभाऊ मुंडे व माजी आमदार केशव आंधळे यांचे सवते सुभे आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके देखील येथे सत्तांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेची भूमिकाही या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com