High Court News : राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द..

NCP News : चौदा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरेखा लहाने यांच्याविरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली होती.
High Court News
High Court NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : जाफराबाद (जि.जालना) नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सुरेखा संजय लहाने यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवणारा मुख्यमंत्री तथा नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या (High Court News) औरंगाबाद खंडपीठाचे न्या. अरुण पेडणेकर यांनी ठरवला आहे. यासंदर्भातील पुन्हा प्रक्रिया सुरू करण्याची सरकारला मुभा देण्यात आली आहे. नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांनी ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. डी. सपकाळ यांच्यामार्फत अपात्र ठरवण्यात आल्याच्या आदेशाला खंडपीठात आव्हान दिले होते.

High Court News
Maratha Reservation News : विरोध सुरू होताच मराठा आरक्षणासाठी भाजपच्या आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र...

याचिकेनुसार सुरेखा लहाने यांच्याविरुद्ध जाफराबादमधील १२ सदस्यांनी २७ फेब्रुवारी २०२३ ला जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. (Jalna) या प्रस्तावात विविध आरोप करण्यात आले होते. त्या अनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला व नगरविकास विभागाला निर्णय कळवला होता. (NCP) त्यानंतर नगर विकास मंत्रालयाने सुरेखा लहाने यांना अपात्र ठरवले होते. या निर्णयाला त्यांनी खंडपीठात आव्हान दिले.

मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांसमोर सुनावणी झाली असली तरी अपात्रतेचा आदेश त्यांच्या विभागाच्या उपसचिवांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत काढला आहे. (Marathwada) तसेच तत्पूर्वी सुनावणीला हजर राहण्यासंदर्भाने काढलेली नोटीस ही जालना नगराध्यक्षांच्या नावाने काढण्यात आली होती. चुकीच्या नोटिसीमुळे सुनावणीला हजर राहण्याविषयी प्रश्न निर्माण झाला होता, असा युक्तीवाद करण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकरणात राज्य सरकार, नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री, त्या विभागाचे उपसचिव, जालना जिल्हाधिकारी, जाफराबाद नगरपंचायत मुख्याधिकारी व दामोदर नामदेव वैद्य यांना प्रतिवादी करण्यात आले होते. प्रतिवादींकडून मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. शिवराज कडू आदींनी बाजू मांडली. याचिकाकर्त्यांडून व्ही. डी. सपकाळ यांनी बाजू मांडली त्यांना संदीप सपकाळ यांनी सहकार्य केले.

काय आहे प्रकरण..

सुरेखा लहाने या जाफ्राबादच्या नगराध्यक्ष आहेत. त्यांच्यावर उपनगराध्यक्ष दामोधर वैद्य यांच्यासह विविध नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सुनावनीनंतर उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी नगराध्यक्षा तसेच नगरसेवक म्हणून देखिल लहाने यांना अपात्र केले आहे. तसेच नगरसेवक म्हणुन सहा वर्षे निवडणूक लढविण्यास त्यांना अपात्र ठरविले आहे.

High Court News
AIMIM Political News : मध्य प्रदेशात एमआयएम निवडणूक लढवणार; काँग्रेसचा खेळ बिघडवणार

जाफराबाद नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे सात, काँग्रेस सहा तर भाजपचे चार नगरसेवक असून यातील राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेस व भाजपच्या मिळून चौदा नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरेखा लहाने यांच्याविरोधात तक्रार करून कारवाईची शिफारस राज्य सरकारकडे केली होती.

नियमांप्रमाणे सर्वसाधारण सभा न घेणे, खोटा इतिवृत्तांत लिहिणे, नगसेवकांच्या खोट्या सह्या घेत ठराव मंजूर करणे, आर्थिक व धोरणात्मक विषय ऐनवेळी घेणे, वित्तीय मंजुरीची मर्यादा विचारात न घेता जादा किमतीचे प्रस्ताव मंजूर करणे, नियमबाह्य खर्च केल्याचा ठपका ठेवत उपनगराध्यक्ष दामोधर वैद्य यांच्यासह विविध नगरसेवकांनी सुरेखा लहाने यांच्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अविश्वास दाखल केला होता.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com