Pathri Assembly Constituency: पाथरीत महायुतीलाही बंडाची लागण, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सईद खान `रासप` कडून लढणार!

CM Loyalist Saeed Khan Joins RSP: रखडलेल्या विकास कामांना गती देऊन त्या माध्यमातून लोकांना जोडून जिल्ह्यात शिवसेना वाढविली. असे असतांना पक्षा कडून मला उमेदवारी देण्यात आली नाही.
CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
CM Eknath Shinde- Sayeed Khan ParbhaniSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या पाथरी मतदारसंघात वेगवान घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. आघाडीमध्ये पाथरीची जागा काँग्रेसकडे असल्याने विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत बंडाचे निशाण फडकल्यानंतर आता महायुतीलाही त्याची लागण झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या सईद खान यांनी आज शिवसेनेचा राजीनामा देत पाथरी विधानसभा मतदारसंघात `रासप`कडून निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केले. महायुतीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. अजित पवार यांनी विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांना उमेदवारी दिली आहे. तेव्हापासून शिवसेनेत नाराजीचे वातावरण होते. अखेर या नाराजीचे रुपांतर सईद खान यांच्या पक्ष सोडण्यात झाले आहे.

सईद खान यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याचे सांगितले. तसेच पाथरीमधून आपण रासपकडून लढणार असल्याचे स्पष्ट केले. रखडलेल्या विकास कामांना गती देऊन त्या माध्यमातून लोकांना जोडून जिल्ह्यात शिवसेना वाढविली. असे असतांना पक्षा कडून मला उमेदवारी देण्यात आली नाही. आपल्यावर अन्याय झाल्याची सर्वच कार्यकर्त्यांची भावना असून त्यांच्याच आग्रहाखातर आपण रासप कडून निवडणूक लढवणार असल्याचे सईद खान यांनी सांगितले.

CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
Parbhani Assembly Constituency : शिवसेनेचा भाजपच्या 'आनंद'वर 'भरोसा', पक्षप्रवेश झाला, उमेदवारी मिळणार का ?

शिवसेना सोडत असल्याचेही खान यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन वर्षांपासून आपण पाथरी शहरासह जिल्ह्यातील अनेक विकास कामे प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र करून भक्कमपणे शिवसेना वाढवली हे नेत्यांना माहिती आहे. (Parbhani) आपली उमेदवारी पक्की असतांना शेवटच्या क्षणी उमेदवारी डावलण्यात आली. यामुळे कार्यकर्ते बिथरले आहेत. परंतु आपण बांधलेली ही मोट वाऱ्यावर सोडणार नाही. विधानसभेची निवडणुक रासप कडून लढविणार आहोत, असे सईद खान यांनी सांगितले.

शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर सईद खान यांच्यासोबत पाथरी आणि जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकही त्यांच्यासोबत बाहेर पडले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता.29) रासपचे राष्ट्रीय नेते महादेव जानकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, असेही खान यांनी स्पष्ट केले. महायुतीकडून पाथरी विधानसभेची जागा शिवसेनाच लढवणार, असे सईद खान वारंवार सांगत होते.

CM Eknath Shinde- Sayeed Khan Parbhani
Shivsena News : शिवसेना पक्षफुटीनंतरची पहिलीच विधानसभा, किती मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेत लढत

परंतु महायुतीतील घटक पक्षांमध्ये अनेक मतदारंघात होणारी अदलाबदल पाहता बऱ्याच ठिकाणी वेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. पाथरीची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने सईद खान नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत थेट रासपकडून विधानसभा लढण्याचा निर्णय घेत महायुतीला धक्का दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com