Parbhani Assembly Constituency : शिवसेनेचा भाजपच्या 'आनंद'वर 'भरोसा', पक्षप्रवेश झाला, उमेदवारी मिळणार का ?

Shinde imported a candidate from BJP against Uddhav Thackeray's candidate : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डाॅ. राहुल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीचा मात्र अद्याप उमेदवार ठरला नाही. शिवाय ही जागा महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी की शिवसेना? लढवणार हे देखील स्पष्ट नव्हते.
Parbhani Shivsena News
Parbhani Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

गणेश पांडे

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या परभणी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विद्यमान आमदार राहुल पाटील यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. पण त्यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण? हा प्रश्न अद्याप सुटला नाही. दरम्यान, आज भाजपचे माजी महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी भाजपला राम राम करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे परभणीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराविरोधात एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या `आनंद` यांच्यावर `भरोसा`, दाखवला असे दिसते.

आनंदराव भरोसे यांचा आज मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. आता शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत परभणीतून आनंद भरोसे यांच्या उमेदवारीची घोषणा होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Parbhani) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती-महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. परभणी विधानसभेची जागा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला येते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डाॅ. राहुल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीचा मात्र अद्याप उमेदवार ठरला नाही. शिवाय ही जागा महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी की शिवसेना? लढवणार हे देखील स्पष्ट नव्हते. अशावेळी आनंद भरोसे यांचा शिवसेनेतील प्रवेश म्हणजे त्यांची उमेदवारी नश्चित, असे बोलले जाते. अनेक विधानसभेच्या मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडीकडून अदलाबदलीचे प्रयोग सुरू आहे. उमेदवारीसाठी एकमेकांच्या उमेदवारांना पक्ष प्रवेश दिले जात आहेत.

Parbhani Shivsena News
Parbhani Assembly Constituency 2024 : शिवसेनेचे राहुल पाटील `मशाल` घेऊन सज्ज !विरोधात धनुष्यबाण- घड्याळ की कमळ ?

राज्यातील नेत्यांचा याला अजिबात विरोध नाही, असेच दिसते. लोहा-कंधार मतदारंसघांच्या उमेदवारीसाठी नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकताच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. (Shivsena) पक्ष प्रवेश होताच त्यांना लोहा-कंधारमधून उमेदवारी जाहीर झाली. आनंद भरोसे यांच्याबाबतीत असेच घडण्याची शक्यता आहे. परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

पक्षफुटीनंतर तो आपल्याकडे खेचण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भाजपची त्यांना मदत होत आहे. मुंबईतील या महत्त्वाच्या घडामोडीमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी आनंद भरोसे यांचा राजकीय प्रवास एक नवीन वळण घेतांना दिसतो आहे. भाजपमधील सक्रिय सदस्य म्हणून काम केलेले भरोसे आता शिवसेनेच्या विचारधारेत आपली राजकीय कारकीर्द पुढे नेणार आहेत.

Parbhani Shivsena News
Shivsena News : शिवसेना पक्षफुटीनंतरची पहिलीच विधानसभा, किती मतदारसंघात होणार शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेत लढत

शिवसेनेत प्रवेश करून भरोसे यांनी आपला विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे, असे मानले जाते. भाजपसारख्या प्रमुख पक्षात कार्य केलेले भरोसे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने निवडणुकीच्या गणितांमध्येही काही बदल संभवतात. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com