'भारत जोडो' यात्रेत वडिलांचा फोटो पाहून भावूक झाला रितेश देशमुख; शेअर केली पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Ritesh Deshmukh News : रितेश देशमुख अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर करताना दिसतो.
Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo Yatra NewsSarkarnama
Published on
Updated on

Ritesh Deshmukh News : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रिय असतो. रितेश देशमुख अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर मजेशीर पोस्ट शेअर करताना दिसतो. तो अनेकदा त्याची पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

काँग्रेसचे (Congress) नेते रितेशचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे निधन होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. मात्र, रितेश अजूनही वडिलांची तितकीच आठवण करतो. तो नियमीत आपल्या वडिलांबद्दलच्या पोस्ट शेअर करताना दिसतो.

Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला पवार, ठाकरे उपस्थित राहणार..

रितेशने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये काही लोक विलासराव देशमुख यांचा फोटो हातात धरलेले दिसत आहेत. वास्तविक, रितेश शेअर केलेला फोटो 'भारत जोडो' (Bharat Jodo Yatra) यात्रेतील आहे.

या फोटोमध्ये अभिनेता दिसत नसला तरी लोक त्याच्या वडिलांचा फोटो हातात धरून बसलेले दिसत आहेत. रितेशने हा फोटो शेअर केल्यावर लोक त्याला विचारू लागले की तो 'भारत जोडो' यात्रेत सहभागी का झाला नाही? रितेशने तीन ग्रीन हार्ट इमोजीसह ही पोस्ट शेअर केली आहे. पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Bharat Jodo Yatra News
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या यात्रेला 250 लेखक-साहित्यिकांचा जाहीर पाठींबा!

पोस्टवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, 'सर, तुम्ही ऐतिहासिक 'भारत जोडो' यात्रेत कधी सहभागी होणार? त्याचवेळी या पोस्टनंतर काही लोक विलासराव देशमुख यांची आठवण करून भावूक झाल्याचे दिसत आहेत. विलासराव देशमुख यांचा राज्यात मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com