Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला पवार, ठाकरे उपस्थित राहणार..

Bharat Jodo Yatra : शेगावची सभा आत्तापर्यंतची सर्वात मोठी सभा असेल. ८ लाख लोक सभेला येतील. तसे नियोजन केले जात आहे.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra sarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे.या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांची एक सभा राज्यात झाली, आता राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील दुसरी व शेवटची सभा शेगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या सभेची जोरदार तयारी कॉंग्रेसकडून सुरु आहे. (Bharat Jodo Yatra latest news)

राहुल गांधी यांची शेगावात होणार सभा ही देशातील सर्वात मोठी जाहीर ठरावी,यासाठी नेते कामाला लागले आहेत.या सभेच्या तयारीची आढावा बैठक काल (शनिवारी) औरंगाबाद येथे झाली. बुलडाण्याचे प्रभारी तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शेगावला १८ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजता होणाऱ्या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होऊ शकतात, अशी माहिती चंद्रकांत हंडोरे यांनी दिली. आनंदसागर समोरील भव्य मैदानावर काम सुरू आहे.

चंद्रकांत हंडोरे म्हणाले, "शेगावची सभा आत्तापर्यंतची सर्वात मोठी सभा असेल. ८ लाख लोक सभेला येतील. तसे नियोजन केले जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक काही तासांमध्येच शेगाव शहरामध्ये दाखल होणार असल्याने त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे,"

Bharat Jodo Yatra
Ajit Pawar : अजितदादांनी मौन सोडलं ; सुळेंवर सत्तारांनी केलेल्या विधानाबाबत म्हणाले..

"या सभेला स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे," असे हंडोरे म्हणाले.

राहुल गांधींच्या नेतृत्वातली भारत जोडो यात्रेला मोठा पाठिंबा मिळत असताना आता या यात्रेला लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तब्बल अडीचशेहून अधिक साहित्यिकांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राहुल गांधींना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com