Raosaheb Danve grandson wedding : नातवाच्या लग्नात रावसाहेब दानवेंच्या हातात 'माईक'; सूत्रसंचालकाला म्हणाले 'व्हय बाजूला...'

Political News : छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मेघना बोर्डीकर, संजय शिरसाठ यांच्यासह अनेक आमदार विवाह सोहळ्यास उपस्थित होते.
Danve grandson wedding
Danve grandson weddingSarkarnama
Published on
Updated on

Raosaheb Danve microphone incident : राजकीय नेत्यांच्या परिवारातील लग्न सोहळा म्हटला की, त्यामध्ये राजकीय नेत्यांचे सत्कार आणि सूत्रसंचालकांचे 'शब्दसुमनांचे प्रवचन' आलेच. या सत्कार सोहळ्याला व सूत्रसंचालकाच्या भाषणाला अनेकदा वऱ्हाडी मंडळी कंटाळून जातात. असाच एक गमतीदार किस्सा मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवाच्या लग्नात घडला. खुद्द रावसाहेब दानवे यांनी 'माईक' हातात घेत नातवाच्या लग्नात सूत्रसंचालन करून स्टेजवरील राजकीय मंडळींना, वऱ्हाडींना खळखळून हसवले.

त्याचे झाले असे की, छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवारी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातवाचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मेघना बोर्डीकर, संजय शिरसाठ यांच्यासह अनेक आमदार विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

सूत्रसंचालन दानवे यांचे कर्मचारी गजानन तांदूळजे करत होते. सत्कारासाठी या मान्यवरांना स्टेजवर बोलवण्यात आले. ऐनवेळी काही नेते आले तर काही अनुपस्थित होते. एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्यात दिग्गज नेते आणि त्यांचे सत्कार यामध्ये सूत्रसंचालकाची काहीशी तारांबळ उडाली.

Danve grandson wedding
Santosh Deshmukh Murder Case: बीडमधून मोठी अपडेट! अखेर मुंडेंच्या 'त्या' कार्यकर्त्याविरोधात पोलिसांनी अ‍ॅक्शन घेतलीच

हजारोंची मंडळी आणि स्टेजवरील राज्याचे दिग्गज नेते व कार्यक्रमाचा रंग बघून रावसाहेब दानवे यांनी अनोखी खेळी केली. एकंदरीत नातवाच्या लग्न सोहळ्यात रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सूत्रसंचालनाच्या मार्फत का होईना नेतेमंडळींच्या भाषणापेक्षा वराडींमध्ये स्वतःचीच हवा करून घेतली. नेत्यांच्या भाषणापेक्षा दानवेंच्याच सूत्रसंचालनाची चर्चा लग्नानंतर रंगली होती.

Danve grandson wedding
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्येचा तपास 'फास्ट ट्रॅक'वर कधी? आता शरद पवारही मैदानात

मीच अँकर झालो असतो तर बरं झालं असतं...

कोणाचं नाव घ्यायचं अन कोणाचा सत्कार कोणी करायचा यामुळे सूत्रसंचालक तांदूळजे आधीच भांबावून गेले होते. इकडे लग्नाला उपस्थित वराडी ताटकळले होते, अशातच रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या अस्सल खुमासदार ग्रामीण शैलीत 'तांदूळजे तू व्हय आता बाजूला....,असे म्हणत प्रसंगावधान साधून माईकचा ताबा घेतला. पटापट नेत्यांची नावे घेत सत्कार समारंभ दानवेंनी मोठ्या शिताफिने आटोपता घेतला. कार्यक्रमाचा रंग बघून व स्टेजवरील नेत्यांचे हावभाव बघूनमीच अँकर झालो असतो तर बरे झालं असतं...,असा टोला देखील यावेळी लगावला.

Danve grandson wedding
NCP Politics: राष्ट्रवादीच्या आमदाराने दिला थेट राजीनाम्याचा इशारा... काय आहे प्रकरण?

अर्जुन खोतकर यांचा दानवेंना टोला

रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांना हातात माईक देऊन वधू-वरांना शुभआशीर्वाद देण्याचा फारच आग्रह केला. त्यावेळी अखेर खोतकर यांनी एक मिश्किल बाण सोडलाच ! नातवाच्या लग्नात आजी आणि आजोबा इतके नटूनथटून आलेले मी पहिल्यांदाच बघत आहे. इतके नटत असता का? असा प्रश्न दानवेंना विचारला. खोतकर यांच्या या प्रश्नावर स्टेजवरील सर्वच राजकीय नेते व बावनकुळे खळखळून हसले.

Danve grandson wedding
Ncp News : धनंजय मुंडेंना धक्का देणारे ट्विट; पालकमंत्रिपदावरून मिटकरींची अजितदादांकडे मोठी मागणी

रावसाहेबांनी दिला वधू-वर पित्याला मान

पांडे व कदम परिवाराच्या या विवाह सोहळ्यात रावसाहेब दानवे हे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे वर व वधु पित्यांना मान देऊन सत्कार करणे अपेक्षित होते. हे दानवेंनी चाणाक्षपणे ओळखून स्वतः वर पित्याकडील परिवारातील ज्येष्ठ सदस्य सुखदेव पांडे यांचा सत्कार केला तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सत्काराचा मान वर पिता जावई मुकेश पांडे यांना दिला.

Danve grandson wedding
Devendra Fadnavis : "मराठा आरक्षणाचा विषय जरांगेंसाठी मजेचा, पण आमच्यासाठी..."; CM फडणवीसांचा हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com