Devendra Fadnavis : "मराठा आरक्षणाचा विषय जरांगेंसाठी मजेचा, पण आमच्यासाठी..."; CM फडणवीसांचा हल्लाबोल, नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणावरून महायुतीला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आता मजा येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis, Manoj Jarange
Devendra Fadnavis, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 25 Dec : मराठा समाजाच्या आरक्षणावरून महायुतीला जेरीस आणणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्याने आता मजा येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे ते पुन्हा फडणवीस यांच पुन्हा टार्गेट करणार असल्याचे दिसून येत आहे. यावर फडणवीसांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा विषय मजेचा नव्हे तर जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं म्हणत जरांगेंना सडेतोड उत्तर दिले आहे. मराठा समाजाला ओबसींच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांची आहे.

यासाठी त्यांनी आंदोलने, उपोषणे केली. निवडणुकीत पाडापाडीचाही इशारा दिला दिला होता. लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला त्यातही प्रामुख्याने भाजपला बसला होता. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक उमेदवारच उभे करणार असल्याचे जाहीर केले होते.

भाजपच्या (BJP) उमेदवारांना पाडण्याचे खुले आव्हान त्यांनी केले होते. त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली होती. जरांगेंच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि रात्रभरात उभी राहणारी व्यवस्था बघता या मागे कोणीतरी बडा नेता असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकी निभाव लागणार नाही हे दिसताच जरांगे पाटलांनी आपली दिशा बदलली.

Devendra Fadnavis, Manoj Jarange
Sanjay Raut : 'लाडक्या बहि‍णीं'चे सत्ताधारी भाऊ राज्याला दारूडा करणार; DCM पवारांचा 'तो' निर्णय दुर्दैवी ठरेल, राऊतांचा हल्लाबोल

प्रत्यक्ष निवडणूक लढण्याऐवजी पाठिंबा घोषित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र लोकसभेत यशस्वी ठरलेले त्यांचे डावपेच विधानसभेच्या निवडणुकीत पुरते फसले आणि महायुतीला बंपर यश मिळाले. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे जरांगेंनी पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने आंदोलन करण्यात आता मजा येईल या त्यांच्या विधानामुळे त्यांचा बोलविता धनी दुसराच कोणीतरी असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण मजेचा नाही तर जिव्हाळ्याचा विषय असल्याचे सांगून त्यांना गप्प केले आहे. तसंच मराठा आरक्षणा संदर्भात महायुती सरकारने जे काही निर्णय घेतले विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी स्वतः मिळून घेतले.

Devendra Fadnavis, Manoj Jarange
Bageshwar Baba : सर्व ख्रिस्ती हिंदू आहेत कारण हा देश हिंदुस्थान आहे'; ख्रिसमसच्या आधी बागेश्वर बाबांच्या वक्तव्याने खळबळ

भविष्यातही आम्ही एकत्रितच जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेऊ असे सांगून फडणवीस यांनी आपल्या एकट्यावर खापर फुटणार नाही याचीही दक्षता घेतली असल्याचे दिसून येते. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावरच राज्यात जातीयवाद का उफाळून येतो या प्रश्नावर हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांना जो काही संदेश द्यायचा तो आपल्या प्रतिक्रियेतून दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com