Rupali Chakankar : `महिला आयोग आपल्या दारी`, २६ रोजी औरंगाबादेत जनसुनावणी

सुनावणी, तक्रारींसाठी मुंबई कार्यालायात येणे शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. (Rupali Chakankar)
Rupali Chakankar
Rupali Chakankarsarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मंगळवार २६ एप्रिल रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. (Rupali Chakankar) महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमातंर्गत त्यांच्या उपस्थितीत येथे जनसुनावणी होणार आहे.

महिलांना न्याय मिळावा, यासाठी महिला आयोग (Maharashtra) आपल्या दारी, हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. (Aurangabad) यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.

या संकल्पने अंतर्गत आयोगाकडे दाखल असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारींची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. याच बरोबर नव्याने आलेल्या तक्ररींवरही कार्यवाही करण्यात येणार आहे.

सुनावणी, तक्रारींसाठी मुंबई कार्यालायात येणे शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत दाखल तक्रारींची सुनावणी आणि नव्या तक्रारीवर कार्यवाही होणार आहे.

Rupali Chakankar
Ashok Chavan : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही..

मंगळवार, २६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे जनसुनावणी होणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी दीपा ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com