Monsoon Session News : ` अहिर मी आज भविष्यवाणी करतो, तुम्हीही भाजपमध्ये याल`..

Monsoon Session News : ` अहिर मी आज भविष्यवाणी करतो, तुम्हीही भाजपमध्ये याल`..

Sudhir Mungantiwar : `त्याग, तपस्या और बलिदान यही भाजप की पेहचान`. `मै और मेरा परिवार` हे आमचे धोरणं नाही.
Published on

Vidhan Parisad : सचिन अहिर मी आज भविष्यवाणी करतो की, एकदिवस तुम्हीही भाजपमध्ये याल, तेव्हा अनिल परबांची अवस्था अश्वत्थामासारखी होईल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अहिर,परब यांना डिवचले. (Monsoon Session News) विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या अविश्वास प्रस्तावाच्या मागणीवर मुनगंटीवार आपले मत मांडत असतांना त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर जोरदार टोलेबाजी केली.

Monsoon Session News : ` अहिर मी आज भविष्यवाणी करतो, तुम्हीही भाजपमध्ये याल`..
Monsoon Session News : उपसभापतींनी पक्ष बदललेला नाहीच, उलट तिकडच्या सदस्यांचेच पद धोक्यात..

अॅड. अनिल परब यांचे मुद्दे खोडून काढत असतांना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना अडथळा निर्माण केला जात होता. यावर मुनगंटीवार संतापले. उपसभापतींना नियम ९ नूसार सर्व अधिकार आहेत. (BJP) उपसभापतींच्या पक्षांतराचा विषय हा विधान परिषदेच्या चर्चेचा भाग नाही. आम्ही दुसरी बाजू मांडायची नाही का ? दादागिरी चालणार नाही, असे ठणकावून सांगतांनाच मुनगंटीवार यांनी परब, सचिन अहिर यांना टोले लगावले.

मुनगंटीवार म्हणाले, ही काय पद्धत आहे, दुसरी बाजू मांडायची नाही का? परब तुम्ही वकील आहात. मी उत्तर देत नाहीये, मला मत मांडण्याचा अधिकार आहे. कृपया मी मत मांडतांना उभे राहू नका, तुम्ही बोलत असतांना मी उभ राहात नाही, तुम्हाला अटकाव करत नाही. (Sachin Ahir) माझ्या मधात बोलायच नाही, आधीच सांगतो. आरडाओरड करून समोरच्याला थांबवणे बरोबर नाही. `त्याग, तपस्या और बलिदान यही भाजप की पेहचान`. `मै और मेरा परिवार` हे आमचे धोरणं नाही, असा चिमटा देखील मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाला काढला.

यावेळी जागेवरून बोलणाऱ्या सचिन अहिर यांना उद्देशून मी आज भविष्यवाणी करतो की, एक दिवस असाही येईल, सचिन अहिर तुम्ही सुद्धा भाजपसोबत याल. आणि अनिल परब तुमची अवस्था अश्वत्थामासारखी होईल, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. सभागृहात व्यक्तीगत दोष, राग, हेतू ठेवून काही करता येत नाही. एखाद्या व्यक्तीवर राग आहे, म्हणून संसंदीय अयुधांचा वापर करता येत नाही. सभापतींचे सर्व अधिकार उपसभापतींना आहेत, तर्कशून्य प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार देखील.

अपात्रतेच्या नोटीसमध्ये पक्ष बदलल्याचे कारण देण्यात आले आहे. शिवसेनेतून शिवसेनेत जाणं हा पक्ष बदल होते का? उपसभापतींच्या बाबतीत पक्ष बदलण्याचा प्रश्न येतो कुठे. त्यामुळे हा विषय सभागृहाचा होवू शकत नाही. केवळ मनातला राग, आपल्याला बाय बाय, टाटा केलं म्हणून अविश्वास प्रस्ताव आणणं चुकीचे आहे. विधान परिषदेचा वेळ राग व्यक्त करण्यासाठी घालवण्यापेक्षा लोक सोडून का जातायेत याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला देत अविश्वास प्रस्तावावरील ही चर्चा थांबवावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com