Abdul Sattar Political News : मराठवाड्यातील प्रत्येक मतदार संघात कोळी महादेव, कोळी मल्हार यासह अन्यायग्रस्त 33 जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनुसूचीत जमातीचा प्रश्न सोडवण्याऐवजी अनेक वर्षांपासून अधिक किचकट बनवण्याचा घाट आदिवासी आमदाराच्या लॉबीने घातला आहे. महाविकास आघाडीच्या काळातही प्रश्न सुटला नाही त्यामुळे समाजाला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही.
तर येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठवाड्यातील प्रश्न नाही सुटल्यास महायुतीच्या आमदारांना गुलाल लागणार नाही. असा इशारा मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार समाजाच्यावतीने थेट मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांना दिला आहे.
मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार समाज बांधवाचा मेळावा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे यशवंतराव सांस्कृतिक सभागृह येथे झाला. यावेळी आमदार ज्ञानेश्वर चौगुले, माजी सनदी अधिकारी दिलीप जमादार, समाजाचे जेष्ठ नेते सिध्देश्वर कोळी, भागवत जमादार यासह प्रमुख पदाधिकारी व कार्याकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी 'कोळी हीच मुख्य जमात असून उर्वरीत उपजाती आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील नोंदीत ब्रिटिश कालीन, निजाम कालीन, भारताची जनगणना असे अनेक संदर्भ असतानाही जातीचे प्रमाणपत्र व वैधता दिली जात नाही. रक्त नात्यातील जात वैधता आहे परंतु त्यांच्या रक्त नात्यात पडताळणी समितीकडून वैधता दिली जात नाही हा प्रश्न अनेक वर्षापासून रखडत ठेवण्यात आला आहे. मात्र, सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सकारात्मक असून लवकरच हा निर्णय होणार आहे.' असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
याचबरोबहर सात ऑगस्ट रोजी अनुसूचीत जाती व जमाती, विमुक्त जाती प्रमाणपत्र अधिनियम सुधारणा विधेयक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय हा अनुसूचीत जमातीसाठी घातक आहे. त्यामुळे हा निर्णय तत्काळ रद्द करण्याची विनंती करणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
तसेच माझ्या सिल्लोड मतदार संघातही हा समाज मोठा असून त्यांच्याशी आपली जवळीक आहे. आमचे वडिलोर्पाजित संबध या समाज बांधवासोबत आहेत. हा समाज इमानदार आहे. त्यामुळे हा अन्याय आपण लवकरच दूर करू असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तर आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लवकरच मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी मल्हार कोळी यांची बैठक मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, बिड यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील आदिवासी कोळी महादेव, मल्हार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.