Sambhaji Nagar Dangal : छ. संभाजीनगर दंगलीची पूर्वकल्पना होती? ; 'एसआयडी'च्या अहवालात धक्कादायक खुलासे!

Chhatrapati Sambhaji Nagar Riot : नामांतर विरोधी आणि समर्थकांमध्ये वाद?
Sambhaji Nagar Dangal :
Sambhaji Nagar Dangal :Sarkarnama

Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीप्रकरणी आता मोठी माहीती समोर येत आहे. दंगलसदृश्य घटनेची एसआयडीने (गुप्त वार्ता विभाग) दंगल घडण्याआधीच सूचना दिली होती. शहराचं नामांतर आणि हिंदू मोर्चामुळे शहरात अस्वस्थता पसरल्याचे अहवाल, एसआयडीने दिला होता. या अहवालात आणखी गोष्टी नमूद करण्यात आले आहेत. एका मराठी वृत्तवाहीनीने एसआयडी अहवालाबात वृत्त दिलं आहे.

ज्या परिसरात दंगल घडली, त्या संबंधित परिसराचा उल्लेख एसआयडीच्या या अहवालात आधीच करण्यात आला होता. आणि शहर पोलिसांना त्याची सविस्तर माहिती दिली गेली होती. या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, जिथे दंगल घडली , तिथे खबरदारी घेण्याची गरज आहे. संबंधित ठिकाणी जास्त बंदोबस्त लावण्याची गरज आहे. कारण या विशिष्ट ठिकाणी नामांतरानंतर आणि हिंदू जनजागरण मोर्चा निघाल्यानंतर या ठिकाणी जास्त अस्वस्थता आहे. म्हणून या ठिकाणी जास्त लक्ष देणे आवश्यक आहे , असे अहवालात नमूद करणयात आले होते.

Sambhaji Nagar Dangal :
Fursungi and Urali Devachi : फुरसुंगी अन् उरळी देवाची या गावांबाबतचा निर्णय राजकीय; जगतापांची शिवतारेंवर टीका

या अहलवालानुलार काही प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र तो पुरेसा नव्हता. हे आता तपासात समोर येत आहे, त्याच बरोबर ज्यावेळी दंगल घडली, त्यावेळी पोलिसांनी जी तत्परता दाखवायला पाहिजे होती, तो कमी पडला. वेळेवर योग्य पावले उचलली असती किंवा अतिरिक्त पोलीस तिथे पाचारण केले असते तर यावर पोलिसांना वेळीच नियंत्रण मिळवता आलं असतं आणि एवढी मोठी दंगल घडली नसती, असंही म्हंटलं जातंय.

Sambhaji Nagar Dangal :
Pimpri-Chinchwad : खंडणीच्या गुन्ह्यात एसीपीसह हवालदाराला दिलासा! तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

नामांतर आणि हिंदू जनजागरण मोर्चा या दोन गोष्टीमुळे जे नामांतरविरोधी लोक होते, त्यांच्यामध्ये अंडररेस्ट होता. त्यांनी काही बैठका घेतल्या होत्या. ज्या बैठकामध्ये आपण शांत राहायचं नाही, आपण प्रत्युत्तर द्यायचं, अशा प्रकारची भावना होती. या बैठकीचा माहिती एसआयडीला मिळाली होती. त्या अनुषंगाने जर काही घडलं तर, त्याला दंगलीचं स्वरूप येऊ शकतं, याबद्दलची माहिती दिली गेली, असं एसआयडीने सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com