Pimpri-Chinchwad : खंडणीच्या गुन्ह्यात एसीपीसह हवालदाराला दिलासा! तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर

Pune News : खंडणीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळाल्याने एसीपी घनवट, हवालदार शिर्केंची वाचली नोकरी
Pune News
Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पद्माकर भास्करराव घनवट आणि वाई (जि.सातारा)येथील हवालदार विजय विश्वनाथ शिर्के यांना त्यांच्याविरुद्ध साताऱा शहर पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात सशर्त हंगामी अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांच्या नोकऱ्या वाचल्या आहेत.

घनवट वर्षभरात सेवानिवृत्त होणार आहेत. तांत्रिक मुद्यावर ६ एप्रिलपर्यंत हा जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्या दिवशी काय होणार, याकडे साताराच नाही, तर पिंपरी चिंचवड पोलिसांचेही लक्ष लागले आहे.

Pune News
Housing Ready Reckoner Rate : बांधकाम व्यवसायाला दिलासा! शिंदे-फडणवीस सरकारची रेडीरेकनेर दराबाबत मोठी घोषणा

कारण घनवट हे साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना २०१६ ला घडलेल्या घटनेप्रकरणी यावर्षी २८ फेब्रुवारीला त्यांच्यासह त्यांचे त्यावेळचे रायटर (लेखनिक) शिर्के यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. सातारा येथील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मधुकर चोरगे हे त्यात फिर्यादी आहेत.

पत्नी व माझा तसेच गुरुकुल या आपल्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांचा छळ करून २५ लाखांची खंडणी मागून त्यातील १२ लाख तीस हजार रुपये आऱोपींनी घेतल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे. तसेच २०१६ च्या दुसऱ्या एका गुन्ह्यातील फिर्यादीला तीन कोटी रुपये देण्यासाठीही घनवट व शिर्केंनी धमकावल्याची चोरगेंची तक्रार आहे.

चोरगेंच्या तक्रारीची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी खासगी तक्रार न्यायालयात दाखल केली होती. त्यावर दिलेल्या आदेशानुसार घनवट व शिर्केविरुद्ध हा जबरी चोरी, खंडणी आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. घनवट सध्या हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एसीपी, तर शिर्के हे वाई (जि.सातारा) पोलीस ठाण्यात हवालदार आहेत.

Pune News
PM Modi Degree : पंतप्रधान किती शिकलेले, हे जाणून घेण्याचा देशाला अधिकार नाही का? केजरीवालांचा सवाल!

त्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी घनवट व शिर्केंनी अॅड.राहुल धायगुडे यांच्यामार्फत सातारा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अतिरिक्त सत्र न्यायधीश ए.एस.जाधव यांनी मंजूर केला.

घनवट यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक ती परवानगी घेण्यात आली नाही. तसेच हा गुन्हा घटना घडल्यानंतर खूप उशीरा म्हणजे सात वर्षानंतर दाखल झाल्याची बाब न्यायालयाने अटकपूर्व जामीन देताना विचारात घेतली.

तोच बचावाचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनीही आपल्या युक्तिवादात मांडला. त्याजोडीने त्यांनी हा गुन्हा दाखल करण्याचा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेशही बेकायदेशीर असल्याचे म्हटले. लाचखोरीच्या गुन्ह्याची दखल विशेष न्यायालयच घेऊ शकते, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com