Nilanga Assembly Constituency: निलंग्यात आजोबा-नातू अन् आता काका-पुतण्या लढतीची परंपरा कायम राहणार का ?

Sambhaji Patil Nilangekar News: 2014 मध्ये काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना संभाजी पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. पण पुतण्या काकांवर भारी ठरला आणि भाजपने निलंग्याची जागा 27 हजार मतांच्या फरकाने जिंकली.
Ashok Patil Nilangeka-Sambhaji Patil Nilangekar News
Ashok Patil Nilangeka-Sambhaji Patil Nilangekar NewsSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Maharashtra Assembly Election 2024 : भाजपने विधानभा निवडणुकीची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये जवळपास सगळ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये काहींची दुसरी, तिसरी, चौथी टर्म आहे. तर निलंगा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांना पक्षाने पाचव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. निलंगा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून आजोबा-नातू आणि त्यानंतर काका-पुतण्यामध्ये लढतीची परंपरा सुरू आहे.

संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसचे उमेदवार आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्याविरोधात दंड थोपटत निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आजोबांना पराभूत करत निलंग्यात पहिल्यांदाच कमळ फुलवले होते. अटीतटीच्या झालेल्या आणि संपुर्ण राज्यात गाजलेल्या या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर अवघ्या दोन हजार मतांनी विजयी झाले होते.

नातवाकडून झालेल्या पराभवाची परतफेड आजोबांनी 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत केली आणि भाजपकडे गेलेली जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. यावेळीही आजोबा-नातू यांच्यात कडवी झुंज झाल्याचे पहायला मिळाले. सात हजारांच्या फरकाने तेव्हा काँग्रेसने ही जागा जिंकली. त्यापुढच्या निवडणुकीत आजोबा-नातवाचा संघर्ष संपला आणि काका-पुतण्यामध्ये नवा वाद सुरू झाला.

Ashok Patil Nilangeka-Sambhaji Patil Nilangekar News
Sambhaji Patil Nilangekar : काँग्रेसची कोरोनासोबत तुलना, संभाजीराव पाटील निलंगेकर नेमंक काय म्हणाले?

2014 मध्ये काँग्रेसने अशोक पाटील निलंगेकर यांना संभाजी पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. पण पुतण्या काकांवर भारी ठरला आणि भाजपने निलंग्याची जागा 27 हजार मतांच्या फरकाने जिंकली. (Congress) 2019 मध्ये पुन्हा संभाजी आणि अशोक पाटील ऐकमेकांच्या विरोधात लढले. दुसऱ्यांदा काँग्रेला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. 2014 च्या तुलनेत पराभवाचे अंतरही वाढले होते.

सलग दोन निवडणुकीत अशोक पाटील निंलगेकर पराभूत झाल्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुतणे संभाजी पाटील निलंगेकर पाचव्यांदा दंड थोपटून मैदानात उतरले आहेत. मात्र काँग्रेस महाविकास आघाडीचा पैलवान अद्याप ठरला नाही. काँग्रेस या निवडणुकीत उमेदवार बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर काका-पुतण्यामधील लढत यावेळी पहायला मिळणार नाही.

Ashok Patil Nilangeka-Sambhaji Patil Nilangekar News
Congress Vs Shivsena : वाद मिटेना! एकही मतदारसंघ ठाकरेंना दिल्यास ‘सांगली पॅटर्न’चा काँग्रेसचा इशारा

सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांना मताधिक्य मिळाले होते. परंतु याचे श्रेय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या अशोक पाटील निलंगेकर यांना मिळाले नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा काँग्रेसची उमेदवारी अशोक पाटलांना मिळते? की मग लातूरचे देशमुख भाकरी फिरवतात हे पहावे लागेल.

महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच निलंग्याची लढत कशी होणार? याचे चित्र स्पष्ट होईल. भाजपने मात्र सलग पाच वेळा संभाजी पाटील निलंगेकर यांना उमेदवारी देत त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराचा झालेला पराभव याची कोणतीही झळ मराठवाड्यातील विद्यमान आमदारांना बसली नाही. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लोकसभेच्या लातूर मतदारसंघातील महायुतीच्या पराभवानंतर सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले होते.

Ashok Patil Nilangeka-Sambhaji Patil Nilangekar News
Latur City Assembly Constituency : अमित देशमुखांच्या बालेकिल्ल्याला भाजपनं घेरलं? इच्छुकांच्या रांगा!

मतदारसंघात विरोधकांना संधी मिळू नये, यासाठी त्यांनी अनेक यात्रा, उपक्रम राबवत मतदारांशी संपर्क वाढवला. आता लोकसभा निवडणुकीत मिळालेले काँग्रेसचे यश हे लाट किंवा `फॅक्टर`चे नव्हते तर पक्ष संघटनेच्या ताकदीतून मिळाले होते, हे सिद्ध करण्याची वेळ काँग्रेसची आहे. संभाजी पाटील यांच्याविरोधात काँग्रेस नवा चेहरा देतो ? की मग भाजप प्रमाणे जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली जाईल, यावर निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजप आपला झेंडा कायम ठेवणार, की काँग्रेस कमबॅक करणार हे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com