Nilanga Assembly Constituency : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविणाऱ्या आघाडीला जागा दाखवा

Marathwada water grid project stalled due to Mahavikas Aghadi, Sambhaji Patil Nilangekar criticizes : मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून निधीची तरतूद केली होती. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज दुष्काळाची समस्या मिटली असती. महाविकास आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला.
Nilanga Constituency News
Nilanga Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी तत्कालीन भाजपा सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून त्यासाठी निधीची तरतूद केली होती. परंतु नंतरच्या महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे दुष्काळाचा प्रश्न सुटला नाही. आघाडी सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पळविले. या आघाडीला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

पाण्यासाठी हा प्रकल्प आवश्यक असून त्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. (Sambhaji Patil Nilangekar) आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी निलंगेकर यांनी मतदारसंघातील डोंगरगाव, तळेगाव,बोरी,हालकी,बेवनाळ, बेवनाळवाडी,सावरगाव, हिप्पळगाव,थेरगाव,रापका, जोगाळा,आरी,बिबराळ,बाकली, राणी अंकुलगा,घुग्गी सांगवी व सांगवी येथे भेटी दिल्या.

राज्यात काम करत असताना लातूर आणि मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. (Latur) सरकारने त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मंजूर करून निधीची तरतूद केली होती. हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर आज दुष्काळाची समस्या मिटली असती. महाविकास आघाडीच्या सरकारने हा प्रकल्प रद्द केला. त्यामुळे दुष्काळ व पाण्याची समस्या अद्यापही तशीच आहे.

Nilanga Constituency News
Nilanga Assembly Constituency : निलंग्यातील 'निष्ठावंत काँग्रेस' कार्यकर्त्यांची पावले चालती भाजपची वाट!

हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मतदार संघातील सर्व नदी-नाल्यातून बारा महिने पाणी वाहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे दुष्काळ मुक्तीसाठी आगामी 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीला विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.

Nilanga Constituency News
Mahayuti And MVA : विधानसभा निवडणुकीत 'आश्वासनांची स्पर्धा'; पण आर्थिक स्थितीचे काय?

महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि प्रगतीसाठी काम केले. यापुढेही हे काम आपण करतच राहणार आहोत. मतदारसंघात विकास कामे करताना अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे उपक्रम आपण सातत्याने राबवले आहेत. मतदारसंघातील महिलांची लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करून घेत त्यांना लाभ मिळवून दिला आहे.

भविष्यात स्त्री शिक्षणासाठी आपण काम करणार आहोत. प्रत्येक गावाच्या विकासासाठी काम करणे हेच आपले ध्येय असल्याचेही निलंगेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,माजी जिप सभापती गोविंद चिलकुरे, संगायोचे अध्यक्ष अनिल शिंदे, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील,माजी जिप सदस्य ऋषिकेष बद्दे,नागनाथ चलमले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,नवनाथ डोंगरे, शहराध्यक्ष विनोद धुमाळे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com