Amit Deshmukh News : लातूरचे माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार अमित देशमुख (amit deshmukh) व त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा काही दिवसापूर्वी सुरू आहे. त्यावर अमित देशमुखांनी स्पष्टीकरणही दिले आहे, पण विरोधक आणि देशमुख यांच्यातही शाब्दीक वाद अद्यापही सुरुच आहे.
"आमचा वाडा मजबुत आहे, तो कधीच हलू शकतं नाही," असे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचे अमित देशमुख स्पष्ट केले होते.विधानसभेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर (sambhaji patil nilangekar) यांनी देशमुखांना पुन्हा डिवचलं आहे. निलंगेकर हे माध्यमांशी बोलत होते.
काही दिवसापूर्वी सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले होते की, महापालिका निवडणुका कधी होतील हे सुद्धा सांगता येत नाही. सध्या आपण अस्थिर परिस्थितीला तोंड देत आहोत. संजय काका पाटील भाजपात या म्हणत आहेत, पण तुम्हीच स्वगृही परतावे. तसेच लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली, कितीही वारे आले तरी तो तिथेच राहणार, असं स्पष्टीकरण अमित देशमुख यांनी दिलं होतं.
त्यावर भाजप आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अमित देशमुख यांनी देशमुख गढी हलत नसल्याचे म्हटले होते. त्यावर "वाडा-गढी हलत नसली, तरी त्यातली माणसे हलतात," असं म्हणत आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
"राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गड तसेच वाडे यांच्यातली माणसं हलून इतर पक्षात गेली आहेत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे," असे संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले.
"अमित देशमुख केवळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यांनी असा संभ्रम निर्माण करू नये. एक तर उंबरठा ओलांडून अलीकडे यावे अथवा जिथे आहे तिथेच राहावे," असा सल्ला संभाजी पाटील-निलंगेकर यांनी अमित देशमुख यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.