Supriya Sule : तुळजापूरमध्ये सुप्रिया सुळेंचं मोठं विधान; म्हणाल्या, 'भावाने मागितलं असतं तर पक्ष, चिन्ह दिलं असतं'

Political News : शरद पवार गटाची तुळजापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं .
Supriya Sule Vs Ajit Pawar
Supriya Sule Vs Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा बुधवारी धाराशिवपर्यंत पोहोचली आहे. शरद पवार गटाची तुळजापूरमध्ये शिवस्वराज्य यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं.

भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं, गेल्या काही दिवसापासून सरकारचं कौतुक वाटायला लागले आहे. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.

आपला पक्ष फुटलेला नाही, तर तो हिसकावून नेलेला आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने मोबदला देण्यावरून सरकारला झापले आहे. जमिनीचा मोबदला न दिल्याने तुमच्या सगळ्या स्कीम बंद करून टाकू, असे कोर्टाने म्हटले आहे. हे जुमलाबाज सरकार आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. (Supriya Sule News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बहिणीला ओवाळणी देणार असे म्हटले होते. त्यावर अहो देवेंद्रजी तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देताय का?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. “जीएसटी घेता, टॅक्स घेता, खत, तांदुळ, हॉटेलमध्ये जेवलं तरी टॅक्स घेता, खिशातून घेता का?”, असेही सुळे म्हणाल्या.

लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली आहे. महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Jayanat Patil News : अशोकराव, जीवनराव, सक्षणा व धैर्यशील यांचे एकमत झाले नाही तर... मीच उभारणार; जयंत पाटलांचा इच्छुकांना टोला

सरकारमधील नेते का चिडले?

दोन आमदारांच्या वक्तव्यानंतर सरकारमधील नेते चिडले होते. त्यामुळे ते जळगावात चिडून चिडून भाषण करत होते. याचा अर्थ यात काहीतरी गोलमाल आहे. लाडकी बहीण योजनेला निधी कुठून आणतात? काही पत्रकार म्हणाले डीपीडीसीचा निधी लाडकी बहीणला दिला जातोय. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करावे. ते अनेकवर्षे अर्थमंत्री होते, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी आमदार रवी राणा यांच्यावर सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. “माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते. डिसेंबरमध्ये लाडकी बहीणच्या लिस्टची छाननी होणार हे कोणाला माहिती होते का हो? मला तर ते माहिती नव्हते. मग यांना कसे कळले?, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

Supriya Sule Vs Ajit Pawar
Shivsena Vs Bjp : कोल्हापुरातील महायुतीत बिनसलं? क्षीरसागरांनी भाजपला ठणकावलं; म्हणाले, शहरातील एक जागा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com