Shivsena News : लोकसभा निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्षांची उमेदवार कोण असावा, याबद्दलची चाचपणीही झाली असून, त्यांना कामाला लागा, असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. (Chandrakant Khaire News) राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडानंतरची ही पहिला लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदेंची सेना असा थेट सामना राज्यातील काही लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे.
एकनिष्ठ विरुद्ध गद्दार असा हा सामना कोण जिंकणार? हे पाहणेही उत्सूकतेचे ठरणार आहे. मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर हा गेल्या 30 वर्षांपासून (Shivsena) शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 2019 च्या निवडणुकीत इथे शिवसेनेचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. (Marathwada) आता 2014 मध्ये या पराभवाचे उट्टे काढण्याच्या उद्देशाने शिवसेना ठाकरे गट उतरणार आहे.
आता त्यांची टक्कर शिंदेंच्या शिवसेना उमेदवाराशी होते की, मग भाजपच्या हे लवकरच स्पष्ट होईल. ठाकरे गटाच्या उमेदवारीबद्दल सध्या माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khiare) यांच्याच नावाची चर्चा आहे. मला लोकसभेची उमेदवारी मिळावी ही जनतेचीच इच्छा असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी `सरकारनामा`शी बोलताना केला आहे. शिवसेनेत बंड झाले, आमदार, खासदार सोडून गेले, पण मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना मी न घाबरता प्रत्त्युतर देत आहे. खासदार नसलो तरी पाच वर्षांपासून सातत्याने जनतेच्या संपर्कात, पक्षाचे काम करत आहे. लोकांना खासदार म्हणून मी केलेल्या कामांची सतत आठवण होते. मतदारसंघात फिरतो तेव्हा लोक मला केलेल्या जुन्या कामांची आठवण सांगतात. गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल पश्चाताप व्यक्त करतात.
पाच वर्षांचा कालावधी एखाद्या राजकारण्यासाठी खूप मोठा असतो. त्याचा जनतेशी संपर्क तुटतो, पण मी तो कायम ठेवला, लोकांची सातत्याने कामे केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या सगळ्याकडे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतली, त्या आदेश मला मान्य असले, असेही खैरे सांगतात.
गेल्या निवडणुकीत झालेल्या शिवसेनेच्या पराभवामुळे पाच वर्षांत जिल्ह्याचे बरेच नुकसान झाले. शहरातील वातावरण बिघडले, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले. गेल्यावेळी झालेली चूक सुधारण्याची संधी मतदार २०२४ च्या निवडणुकीत मिळणार आहे. त्याची ते आतुरतेने वाट पाहात आहेत, असेही खैरे म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.