Samrudhi High Way : सात दिवसांत समृद्धीवरून धावली पन्नास हजार वाहने..

MSRDC : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त.
Samrudhi High Way News, Aurangabad
Samrudhi High Way News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून सात दिवसांत ५० हजारांहून अधिक वाहने धावली आहेत. Samrudhi High Way ११ डिसेंबर रोजी या महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहुन अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.

Samrudhi High Way News, Aurangabad
Nanded : पाकिस्तानी बिलावलचा पुतळा जाळतांना खासदारांच्या हाताची बोटंच भाजली..

लोकार्पण सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांसाठी खुला करण्यात आला. नागपूर ते शिर्डी या ५२० कि.मी. च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत ५० हजारांहुन अधिक वाहनांनी प्रवास केला. (MSRDC) द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची गैरसोय होऊ नये, याबाबत एमएसआरडीसीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. (Maharashtra) महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी व शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी अल्पोपहार, पिण्याचे पाणी तसेच पंक्चर, हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे. तसेच वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा देखील या ठिकाणी पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा सुरु करण्याची प्रक्रिया वेगाने होत असून लवकरच प्रवाशांना ती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. अपघाता सारख्या घटना घडल्यास अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी २१ शीघ्र प्रतिसाद वाहने द्रुतगती मार्गावरील इंटरचेंजवर तैनात आहेत.

या वाहनांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी व घटना नियंत्रण करणेसाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या शिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण १३ गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील. द्रुतगती मार्गावर सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस तैनात आहेत.

तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे एकूण १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण १५ रुग्ण वाहिका आहेत. रुग्णवाहिका स्थानिक रुग्णालयांशी संलग्न ठेवण्यात आलेल्या आहेत. अपघात होऊ नये व सुरक्षित प्रवास होण्याच्या दृष्टीने प्रवाशांनी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी वाहनाचे इंजिन, इलेक्ट्रीक वायरिंग, टायर्स इ. सुस्थितीत असण्याची खात्री करणे.

Samrudhi High Way News, Aurangabad
Marathwada : प्रचार संपला, आता मतदान ; मराठवाड्यात आघाडी ? की शिंदे-फडणवीसांची जादू..

द्रृतगती मार्गावर वाहनाची गती विहित मर्यादित ठेवणे, जेणेकरुन सुरक्षित प्रवास होईल. लेनची शिस्त पाळणे, चूकीच्या बाजूने ओव्हरटेक करु नये, मुख्य मार्गिकेवर वाहने पार्क करु नये, दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, सीट बेल्ट वापरणे इत्यादी बाबींचे काळजीपूर्वक पालन करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com