Kshirsagar Bandhu Politics : पावसाळ्यातही बीडवासियांचे घसे कोरडे; क्षीरसागर बंधू करताहेत बिंदूसरा धरणाचे जलपुजन

Jalpujan of Bindusara Dam by Kshirsagar brothers : बीडमधील बिंदूसरा धरणाचे जलपुजन क्षीरसागर बंधूनी केली. परंतु बीडवासियांना धरणाचे पाणी अजून काही मिळाले नाही.
Kshirsagar Bandhu Politics
Kshirsagar Bandhu Politics Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडची अडीच लाख जनता पाण्यासाठी त्रस्त आहे. अगदी पावसाळ्याने सर्व नद्या भरुन वाहत असून तलावही ओसंडले आहेत. पण, बीडच्या नागरिकांच्या भर पावसाळ्यातही पाण्यासाठी खस्ताच सुरू आहेत.

पदावर आणि सत्तेत असलेल्या क्षीरसागरांना बीडकरांना वेळेवर पाणी पाजण्यात आणखी यश आलेले नाही. मात्र, वरुणराजाच्या कृपेने भरलेल्या बिंदूसरा धरणाचे जलपुजन करण्याची घाई क्षीरसागर बंधूंनी केली.

बिंदूसरा धरणावरून देखील बीड (Beed) शहरासाठी पाणी योजना आहे. बीडवासियांना अख्खा उन्हाळा 20 ते 23 दिवसांनी पाणी येत होते. आता पावसाळ्याचे तीन महिने झाले, तरी हीच गत कायम आहे. अमृत अटल योजनेसाठी नव्याने बसविलेल्या अतिरिक्त विद्युत पंपांना आवश्‍यक वीज भार उपलब्ध नाही. पालिकेकडे महावितरणचे थकलेले 39 कोटी रुपये देयक थकलेले आहे. देयक अदा केल्याशिवाय अतिरिक्त वीज भार नाही, या भूमिकेवर महावितरण ठाम आहे. मात्र, दोन वर्षांपासून लवकरच वीज मिळेल, आणि बीडकरांना सुरळीत पाणी मिळेल, अशा घोषणा आणि आश्‍वासने क्षीरसागर बंधू देत आहेत.

अतिरिक्त वीज पुरवठा आणि थकीत देयकाचा मुद्दा यावर उपमुख्यमंत्री अजित पवार , पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या नेत्यांच्या भेटी, बैठका आणि लवकरच प्रश्‍न सुटण्याची आश्‍वासने दिली. घोषणा ऐकूण बीडकरांच्या कानात पाणी शिरले. परंतु घसा कोरडाच आहे. आता या प्रश्‍नात क्षीरसागर विरोधकांनीही उडी घेत मागच्या काही महिन्यांपासून याच घोषणा केल्या. अगदी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही अधिकाऱ्यांची बैठक लावली. पण, सदर बैठकही निष्फळच ठरली. त्यांनीही या विषयाशी संबंधीत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक लावण्याबाबत दिलेल्या तारखीलाही महिना लोटला पण मुहुर्त मिळालेला नाही.

क्षीरसागरांमधील श्रेयवाद

संदीप क्षीरसागर आमदार आहेत. तर, डॉ. योगेश क्षीरसागर राज्यातल्या सत्तेच्या बळावर पालिकेच्या प्रशासनावर कमांड ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. पण, बीडचा पाणीप्रश्‍न कायम आणि क्षीरसागरांमधील श्रेयवाद आणि एकमेकांवरील आरोपही कायमच आहेत. दरम्यान, रविवारी आमदार संदीप क्षीरसागर यांनी समर्थकांसह बिंदूसरा धरणातील पाण्याचे विधीवत पुजन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांनीही जलपुजनाचा कार्यक्रम केला.

जाधव यांनी क्षीरसागर बंधूंना सुनावले

दरम्यान, योजनांच्या घोषणा करुन बीडकरांना पाण्यावाचून त्रस्त करणाऱ्या क्षीरसागर बंधूनी जलपुजनाच्या माध्यमातून इथं देखील वरुणराजाच्या कृपेवर आयत्या रेघोट्या ओढल्याचा टोला सनदी लेखापाल बी. बी. जाधव यांनी लगावला. बीडची जनता दुधखुळी नसून यांचे फोटोसेशन, श्रेयवाद, पोकळ घोषणांनी बीडकरांना उबग आल्याचेही जाधव यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com