Sandip Kshirsagar: पक्ष अडचणीत असताना पवारांवर दाखवलेली निष्ठाच कामाला आली; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा उमेदवारी

NcpSP Candidates List News : बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि जिल्हाध्यक्षही आहेत.
Sandip Kshirsagar Sharad pawar.jpg
Sandip Kshirsagar Sharad pawar.jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : पक्षफुटीनंतर शरद पवारांवर ठेवलेली निष्ठा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कामी आली. पक्षातील एका गटाचा विरोध असतानाही शरद पवारांनी बीडसाठी संदीप क्षीरसागर यांचेच नाव फायनल केले. अजित पवारांच्या दोन्ही बंडांच्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ दिली.

त्यावेळी मंत्री असलेले काका जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्या संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता.

2017 साली नगर पालिकेच्या निवडणुकीत काकू नाना विकास आघाडीच्या माध्यमातून काका जयदत्त क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना आव्हान दिले आणि चांगले यशही मिळविले. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार होते.

दरम्यान, पक्षातील काही नेत्यांकडून संदीप क्षीरसागर यांना बळ मिळत असल्याच्या मुद्द्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी थेट भाजपचा प्रचार केला आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना मंत्रीपद आणि बीडची उमेदवारीही दिली.

Sandip Kshirsagar Sharad pawar.jpg
Amit Thackeray Interview : ...अन् अमित ठाकरे म्हणाले 'कर्म कुणालाच चुकत नाही'

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असलेल्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव झाला. दरम्यान, निवडणुकीनंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेला शपथविधी आणि मागच्या वर्षी पुन्हा सत्तेत सहभाग या दोन्ही पक्षफुटीवेळी संदीप क्षीरसागर यांनी सत्तेसोबत जाण्याची संधी सोडून शरद पवारांवर (Sharad Pawar) निष्ठा ठेवली.

बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार आणि जिल्हाध्यक्षही आहेत.

Sandip Kshirsagar Sharad pawar.jpg
Amit Thackeray Interview : ...अन् अमित ठाकरे म्हणाले 'कर्म कुणालाच चुकत नाही'

दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर समिकरणे बदलली आणि पक्षातील एका गटाने त्यांच्या उमेदवारीच्या वाटेत ब्रेकर अंथरले. आष्टीतून मेहबूब शेख, केजमधून पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या.

परंतु, दोन्ही याद्यांमध्ये त्यांचे नाव न आल्याने बीडच्या उमेवारीचा सस्पेन्स वाढला हेाता. अखेर शनिवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत संदीप क्षीरसागर यांना बीडची उमेदवारी जाहीर झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com