Sandipan Bhumre : तुम्ही कारखान्यात दारू तयार करत नाही का ? पवारांना सवाल..

Paithan : मतदारसंघात ही सहावी सभा आहे, आणखी २५ सभा घेतल्या तरी पैठणचा आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच होणार.
Sandipan Bhumre-Ajit Pawar news, Aurangabad
Sandipan Bhumre-Ajit Pawar news, AurangabadSarkarnama

Marathwada Politics : आदित्य ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्यावर त्यांनी उघडलेल्या वाईन शाॅपवरून टीका केली. पैठणमध्ये काल झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी खास आपल्या शैलीत भुमरेंवर तुम्ही तरुण पिढी बरबाद करायला निघालात का? लोकांच्या संसाराची राखरांगोळी करायला निघालात का? याच्यासाठी तुम्हाला जनतेने निवडून दिले का? असे म्हणत भुमरेंवर हल्ला चढवला होता.

Sandipan Bhumre-Ajit Pawar news, Aurangabad
G-20 News : परदेशी पाहुण्यांसमोर सगळं काही ओक्के हवं, चार दिवस आंदोलन नकोच..

त्याला भुमरेंनी देखील प्रत्युत्तर देत `तुमच्या कारखान्यात तुम्ही दारू तयार करत नाही का? तुमच्या डिस्लरीज नाही का ? (Paithan) पैठणमध्ये तुम्ही ज्यांच्या घरी थांबला होतात, त्यांचे परमीट रुम तुम्हाला दिसले नाही का? असा सवाल उपस्थितीत केला. (Ajit Pawar) माझ्या मतदारसंघात ही सहावी सभा आहे, आणखी २५ सभा जरी घेतल्या तरी पैठणचा आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच होणार, असा दावा देखील भुमरे यांनी केला आहे.

राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या महाविकास आघाडीच्या निशाण्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांनी तिसऱ्यांदा पैठण मतदारसंघातल्या बिडकीन येथे सभा घेत भुमरे यांनी सुरू केलेल्या वाईन बारचा जाहीर उल्लेख केला होता. यावर नऊ नाही बारा माहिती घ्या, असे म्हणत भुमरेंचे १२ वाईन शाॅप असल्याचे म्हटले होते.

त्यासमोर टाकलेल्या स्पीड ब्रेकरचा उल्लेख करत देखील त्यांनी टीका केली होती. काल राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी देखील भुमरे यांना लक्ष्य करत त्यांनी २५ वर्षात पैठण तालुक्यासाठी काय केले? असा सवाल उपस्थितीत केला होता. यावर भुमरेंनी अजित पवार, आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले.

आतापर्यंत माझ्या मतदारसंघात सहा सभा झाल्या, अजून २५ सभा जरी घेतल्या तरी पैठणचा आमदार हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच होणार हे लक्षात ठेवा. माझ्यावर टीका करतांना तुमच्या कारखान्यातही तुम्ही दारूच बनवता हे लक्षात ठेवा. तुम्हाला माझे वाईन बार दिसतात, मग तुम्ही ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडे थांबला होतात, त्याचे परमीट रुम दिसले नाही का? असा सवालही भुमरे यांनी अजित पवारांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com