Sandipan Bhumre News : निधीची चिंता करू नका, कामे जलदगतीने करा ..

Shivsena : पैठण मतदारसंघासाठी अर्थमंत्र्यांनी निधीच दिला नाही,असा आरोप केला गेला होता.
Sanipan Bhumre, News Marathwada
Sanipan Bhumre, News MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : श्री क्षेत्र पैठण व आपेगांव येथे अनेक भाविक भेट देतात. त्यामुळे पैठण व आपेगाव येथील विकास प्राधीकरणांतर्गत सुरू असलेली विकास कामे जलदगतीने पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिले.

Sanipan Bhumre, News Marathwada
Pankaja Munde News : भगवान गडाप्रमाणेच गहिनीनाथ गड माझे श्रद्धास्थान..

भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण (Paithan) व आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत मंजुर आराखड्यातील विकास कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, आमदार प्रदीप जैस्वाल,(Pradip Jaiswal) उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे तसेच संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत पालकमंत्र्यांना (Guardian Minister) सादरीकरणाव्दारे विकास कामांची माहिती देण्यात आली. (Shivena) यावेळी भुमरे म्हणाले, पैठण येथील नाथ मंदिरातील विद्युत रोषणाईचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे. तसेच मंदिरा शेजारी असणारे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे.

आपेगांव येथील घाटाचे काम लवकर पूर्ण करावे, प्राधिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात पैठण मतदारसंघासाठी अर्थमंत्र्यांनी निधीच दिला नाही,असा आरोप केला गेला होता. त्यानंतर भुमरे यांनी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com