Sanjana Jadhav News : मोर्चाला गर्दी, अन् जोरदार भाषणाने संजना जाधवांचे कमबॅक...

Kannad : संजना यांनी मोर्चा काढला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला.
Sanjana Jadhav Rally In Kannad News, Aurangabad
Sanjana Jadhav Rally In Kannad News, AurangabadSarkarnama

Aurangabad : शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानेव यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांनी कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात कमबॅक केले आहे. राज्यात तुमचेच सरकार असतांना मोर्चा कशासाठी? थेट मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, पीक विम्याचे पैसेच द्या, असे म्हणत संजना यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Sanjana Jadhav Rally In Kannad News, Aurangabad
Sanjana Jadhav News : दहा वर्ष घरात आमदारकी माझ्यामुळेच ; आता जनता माझ्या पाठीशी..

परंतु हा मोर्चा म्हणजे संजना जाधव यांच्या विधानसभेच्या तयारीची सुरूवात म्हणून कढाण्यात आल्याची चर्चा होत आहे. (Kannad) संजना जाधव यांना माहेरी आणि सासरी राजकीय वारसा लाभल्यामुळे त्यांच्यासाठी हे क्षेत्र नवे नाही. शिवाय पिशोर सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केलेले असल्याने त्यांना राजकारण चांगले कळते हे कालच्या मोर्चावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. (Bjp)

संजना यांना तालुक्यात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असली तरी वडिलांचा हात डोक्यावर असल्याशिवाय ते शक्य नाही हे तेवढेच खरे. विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर मतदारसंघातील संजना यांचा हा मोर्चा, त्याला जमणारी गर्दी आणि यातून त्या काय बोलतात ? याकडे तालुक्याचे आणि त्यांच्या विरोधकांचे देखील लक्ष लागले होते.

अपेक्षेप्रमाणे कन्नड तहसिल कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा हा संजना यांचा तालुक्यातील राजकारणातील कमबॅकसाठी महत्वाचा ठरला. मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती, याहीपेक्षा संजना जाधव यांनी एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखे केलेले भाषण उपस्थितांना भावले. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षा संजना यांच्या राजकीय पुनरागमनासाठी घातलेला हा घाट होता हे आता स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय मंत्र्यांची मुलगी आपल्याच सरकारविरोधात मोर्चा काढत आहे, अशी टीका विरोधकांनी केली होती. मात्र त्याकडे फारसे लक्ष न देता संजना यांनी मोर्चा काढला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला. या मोर्चानंतर आता कन्नड-सोयगांव मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले तर नवल वाटायला नको. संजना यांनी विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांच्यावर टीका करतांनाच दोनवेळचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरही हल्ला चढवला. संजना यांचा हा आक्रमक पावित्रा पाहता, येणारी कन्नड-सोयगांव मतदारसंघाची निवडणूक अधिक रंजक होणार याचा ट्रेलरच पहायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com