Maharashtra Assembly Election 2024 : मागील पाच वर्षात उदगीर मतदार संघाचा भौतिक विकास करण्याबरोबरच बौद्धिक मेजवानी देण्यासाठी उदगीर मध्ये प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा मराठी बाणा यासह विविध उपक्रम घेतले. आपल्या उदगीर शहराची ओळख जगाच्या नकाशावर करण्याचे काम केले, असा दावा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांनी केला.
उदगीर तालुक्यातील सोमनाथपूर, हकनकवाडी, वंजारवाडी गंडीपाटी या भागातील नागरिकांशी गाव भेट दौऱ्यानिमित्त त्यांनी संवाद साधला. (NCP) गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उदगीरचा सर्वांगीण विकास केला असुन या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटवला. नांदेड जिल्ह्यातील बारूळ धरणातून मतदार संघात पाणी आणण्यासाठी वॉटर ग्रीड सारखी सर्वात मोठी योजना मंजूर करून मतदार संघाचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटवला.
बॅरेजेस व कोल्हापुरी बंधारे उभारून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन या भागातला शेतकरी समाधानी होईल, यासाठी प्रयत्न केल्याचे बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. आपले महायुतीचे सरकार हे सर्वसमान्यांचे सरकार असुन लाडक्या बहिणीसाठी योजना आणली आणि ती पूर्ण केली. मतदार संघात सौर ऊर्जेचे प्रकल्प आणले असुन भविष्यात दिवसा ही माझ्या शेतकरी बांधवांना वीज पुरवठा करण्याचा आपला मानस आहे.
मी मंत्री असताना देखील केवळ आपला भाऊ म्हणूनच प्रामाणिकपणे गेली पाच वर्ष आपली सेवा केली आहे. आपल्या कामाच्या बळावरच मी आपल्यापुढे आपला आशिर्वाद मागण्यासाठी येत आहे. आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला आशिर्वाद द्याल, असा विश्वास बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला. (Udgir) आपल्या आशिर्वादाच्या जोरावरच उदगीर जिल्हा करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे बनसोडे म्हणाले. यावेळी सोमनाथपूर, हकनकवाडी, वंजारवाडी गंडीपाटी या भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, प्रा.श्याम डावळे, अमोल निडवदे, उदयसिंह मुंडकर, जितेंद्र शिंदे, प्रकाश राठोड, अजित राठोड, सतीश सुळे, रोहिदास कुंडगीर, वैजनाथ बिरादार, माधव पाटील, नरसिंग कांबळे, साधु लोणीकर, जावेद शेख, प्रदीप पवार, अमित माडे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.