NCP Ajit Pawar : अमोल मिटकरींना 'NCP' पक्ष संघटनेबाबत काही तरी सुचवायचंय, पण...

Amol Mitkari Viral Post on NCP Seat Allocation: महायुतीतून विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात जागा वाटपावर प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केलेली पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे.
Amol Mitkari 1
Amol Mitkari 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीत जागा वाटपावर अजून खल सुरू आहे. महायुतीमधून भाजप सर्वाधिक जागा लढणार हे निश्चित झालं आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसला जागा लढेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत कमी जागा मिळणार, असे स्पष्ट झालं आहे.

शिवाय, काही जिल्ह्यात तर जागाच मिळाल्या नाहीत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी पक्षश्रेष्ठींकडे चिंता व्यक्त केलीय. असंच राहील, तर पक्ष संघटना वाढणार कशी? आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होईल, याबाबत सावध केले आहे.

अमोल मिटकरी यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला संघटना मजबूत असून, देखील जागा मिळाली नाही, याविषयी खंत व्यक्त केली आहे. तसेच पक्षश्रेष्ठींचे देखील लक्ष वेधताना आगामी राजकीय वाटचालीत यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम होईल, याबाबत सावध केलं आहे.

Amol Mitkari 1
Vikhe Vs Thorat : जयश्री थोरात, खासदार वाकचौरे यांच्यासह 50 जणांवर गुन्हे...

अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधानसभा मतदारसंघापैकी चार जागा भाजपला, (BJP) तर एक जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाला सुटली आहे, याकडे लक्ष वेधताना अमोल मिटकरी यांनी या जिल्ह्यात गेली चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले.पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली. मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे, असे सांगून लक्ष वेधले. तसंच याकडे पक्ष संघटनेचे लक्ष वेधताना विधानसभा संधी मिळाली नसल्याची अप्रत्यक्षरित्या खंत देखील व्यक्त केली.

Amol Mitkari 1
Beed Politics : 'आमच्या नेत्यालाच पक्षात किंमत नाही तर आमचं काय?'; म्हणत आणखी एका नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी

पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम , बुलडाणा जिल्ह्यात एकाही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार नसणे हे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी वेळी निश्चित चिंताजनक बाब राहणार आहे. या तिन्ही जिल्ह्यात घड्याळ चिन्हं नाही, याचा खेद वाटतो, असेही अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांना पक्ष संघटना वाढीविषयी खरंच चिंता आहे आहे, तर समाज माध्यमांवर थेट पोस्ट करण्यापेक्षा संघटनेच्या बैठकांमध्ये हा मुद्दा रेटता आला असता. परंतु त्यांनी समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत पक्ष नेतृत्वाच्या संघटनेवरील प्रभावावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवलं आहे. तसंच पक्षातील वरिष्ठ नेते युवा नेत्यांकडे लक्ष देत नाहीत. संधी देत नाही, असे तर सुचवायचे, तर नाही ना! महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी होत आहे का? भाजप पक्षाची संघटना कमकुवत करत आहे का? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांच्या पोस्टमधून डोकावत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com