Sanjay Jadhav March For Farmers : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक; संजय जाधवांचा रत्नाकर गुट्टेंवर गंभीर आरोप

Uddhav Thackeray Vs Dhananjay Munde : कृषिमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधीक शेकऱ्यांच्या आत्महत्या
Sanjay Jadhav
Sanjay JadhavSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाज आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. यातच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरे गटानेही सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्याने त्या सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी विविध मागण्या घेऊन ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जाधवांनी गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष, आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Latest Political News)

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू झालेले मराठा आंदोलन लाठीचार्जनंतर राज्यभर पेटले. यातच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या मागणीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे ठाम राहिल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. आजपासून ओबीसी समाजानेही आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच धनगर समाजही एस.टी. प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीबाबत राज्यभर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. परिणामी सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत. यातच दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्यात यावी, थकीत पीकविमा द्यावा, आदी मागण्यांबाबत खासदार जाधवांनी गंगाखेड उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

Sanjay Jadhav
INDIA vs NDA : बिहारमध्ये 'इंडिया'ची तयारी; मतदारसंघांबाबत आरजेडी, जेडीयूची रणनीती ठरणार

संजय जाधव म्हणाले, "मराठवाड्यातील पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा.' जाधव यांनी गंगाखेड शुगर्सने शेतकऱ्यांच्या नावे कर्ज काढल्याचा आरोप केला आहे. "गंगाखेड शुगर्सचे अध्यक्ष तथा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले आहे. या कर्जामुळे हजारो शेतकऱ्यांचे सीबील स्कोअर खराब झाला आहे. परिणामी कोणतीही बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. शेतकऱ्यांची अडचण टाळण्यासाठी कर्ज भरून गंगाखेड शुगर्सने शेतकऱ्यांचे सीबील स्कोअर सुधारावेत.

दरम्यान, राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात सर्वाधीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे विरोधकांनी मुंडेसह सरकारव टीकेची झोड उठवली आहे. राज्यात ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील १८६ शेतकरी बीडमधील आहेत. जीव घेण्यासाठी मुंडेंना कृषिमंत्री पद दिले का ? शासन अस्तित्वात आहे का ? सरकारने महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला का ? स्वतःच्या तिजोरी भरून सरकारची तिजोरी लुटण्याच काम सुरु आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Jadhav
Satara Pusesavali News: पुसेसावळी दंगलप्रकरणी पावसकरांसह पाच जणांवर गुन्हा दाखल होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com