INDIA vs NDA : बिहारमध्ये 'इंडिया'ची तयारी; मतदारसंघांबाबत आरजेडी, जेडीयूची रणनीती ठरणार

Nitish Kumar And Lalu Prasad Yadav : बिहारमध्ये भाजप मित्र पक्षांना टक्कर देण्याच्या तयारीत इंडिया
Nitish Kumar And Lalu Prasad Yadav
Nitish Kumar And Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे 'एनडीए' व 'इंडिया' आघाडीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 'इंडिया' पक्षाचे घटक असलेल्या 'आरजेडी' आणि 'जेडीयू'ची पटण्यात बैठक होत आहे. या बैठकीत दोन्ही पक्षांची लोकसभा मतदारसंघांबाबत रणनीती ठरणार आहे. (Latest Political News)

लोकसभा निवडणुकीसाठी 'आरजेडी' आणि 'जेडीयू'ची पटण्यात बैठक होत आहे. या बैठकीत आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे. सोमवार व मंगळवारी होत असलेल्या या दोनदिवसीय बैठकीत वेगवेगळ्या बैठका होणार आहेत. त्यामध्ये जागा वाटपासह अन्य विषयांवर चर्चा होणार आहे.

Nitish Kumar And Lalu Prasad Yadav
Mahadev Jankar On Dhangar : धनगर आरक्षणावर महादेव जानकर आक्रमक; म्हणाले, "आम्ही 'एनडीए'सोबत पण..."

बैठकांमध्ये दोन्ही पक्षांचे आमदार आणि नेते सहभागी होणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यांच्याकडून मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती जाणून घेऊन लोकसभा मतदारसंघांबाबत दोन्ही पक्ष रणनीती ठरवणार असल्याचे समजते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (NDA Vs INDIA)

दरम्यान, नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी 'एनडीए'ने तयारी सुरू केली आहे, तर मोदींना विजयापासून रोखण्यासाठी 'इंडिया' आघाडीतील पक्षांनी कंबर कसलेली आहे. 'इंडिया'तील प्रत्येक पक्ष विविध राज्यांत 'इंडिया'च्या छताखाली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. याच धर्तीवर बिहारमध्ये इंडियातील 'आरजेडी' आणि 'जेडीयू'ने जोरात तयारी सुरू केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Nitish Kumar And Lalu Prasad Yadav
CM Eknath Shinde News : मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य अपेक्षित, राजकारण न करण्याची शिंदेंची साद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com