Sanjay Jadhav News : पक्षाशी एकनिष्ठ राहिलो म्हणून तिसऱ्यांदा उमेदवारी, अन् आता विजयी पण होणार..

Political News : पक्षाशी, उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलो म्हणूनच मला तिसऱ्यांदा उमेदवारी आणि आता विजय पण मिळणार आहे, असा दावा लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Jadhav, Uddhav thackeray
Sanjay Jadhav, Uddhav thackeray Sarkarnama

Parbhani News : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटली तेव्हा मला पण ऑफर होती. आमच्यासोबत या तुमची सगळी कामे मार्गी लावू, मोठ्या प्रमाणात निधी देऊ. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही जिकडे गेला तिथे सुखी राहा, मला माझ्या घरी सुखी राहू द्या. पक्षाशी, उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलो म्हणूनच मला तिसऱ्यांदा उमेदवारी आणि आता विजय पण मिळणार आहे, असा दावा लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मी शिंदे सेनेसोबत गेलो असतो तर माझा परभणीतून दारूण पराभव झाला असता, कदाचित मला भाजपने तिकीटही मिळू दिले नसते, असेही जाधव यांनी सांगितले. मराठवाड्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले.

महायुतीचे (Mahayuti) महादेव जानकर (Mahadev Jankar) विरुद्ध महाविकास आघाडीचे (MVA) संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यात थेट सामना झाला. महादेव जानकर हे बाहेरचे उमेदवार आहेत, परभणीकरांच्या अडचणी, प्रश्न सोडवायला ते साताऱ्यातून येणार आहेत का? असे म्हणत जाधव यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा हा प्रचाराचा मुद्दा केला होता. (Sanjay Jadhav News)

Sanjay Jadhav, Uddhav thackeray
Yogendra yadav News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळणार इतक्या जागा; योगेंद्र यादवांचा मोठा दावा

मतदान जसजसे जवळ आले तसे परभणी मतदारसंघातील निवडणूक ही जातीयवादाकडे झुकली. जानकरांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तोच मुळात जातीचे गणित डोक्यात ठेवून. ओबीसी, वंजारी मतांची लक्षणीय संख्या हेच जानकरांचे परभणीतून लढण्याचे प्रमुख कारण होते.

जानकरांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून जातीयवाद वाढवला. परभणी जिल्ह्याच्या राजकारणात असे कधी घडले नव्हते. आम्ही कायम विकासाच्या मुद्याला प्राधान्य दिले.

जानकरांनी जातीयवादाला खतपाणी घालणारी विधान केली आणि मराठा समाज एकवटला. गंगाखेड, जिंतूर सारख्या भागात मला कमी मते पडली तरी इतर विधानसभा मतदारसंघात मी त्याची भरपाई करेन आणि एक लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला. जानकर यांच्यासाठी मोदींनी परभणीत सभा घेतली तिथेच माझा विजय निश्चित झाला. मोदींच्या नावावर मते मिळण्याचे दिवस आता गेलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडी आणि उमेदवार म्हणून आम्हाला होईल, असेही जाधव यांनी सांगितले.

परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, इथली जनता गद्दारी कधी खपवून घेत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास राहिला आहे. त्यामुळे कोणी कितीही जातीयवाद केला, तरी परभणीची जनता आणि मतदार शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे, असे सांगत जाधव यांनी आपलाच विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला.

(Edited By : Sachin Waghmare)

Sanjay Jadhav, Uddhav thackeray
MP Sanjay Jadhav on Eknath Shinde : "शिंदे गटातल्या नेत्यांचे आजही फोन, भेटायचं म्हणतात.." ; ठाकरेंचे खासदार जाधव म्हणाले..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com