Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे उत्तम कलाकार त्यांच्या संवेदना मला अधिक माहिती...

Political News : मोदी आणि शाह यांचे व्यंगचित्र त्यांनी काढले ते मला आवडले. त्यात भावना होती, म्हणून ते मी सोशल मीडियावर टाकले, असे सांगत खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर चिमटा काढला.
Raj Thackeray, Sanjay Raut.
Raj Thackeray, Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajinagar News : राज ठाकरे उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या मनातील संवेदना आणि खंत मला अधिक माहिती आहे. मोदी आणि शाह यांचे व्यंगचित्र त्यांनी काढले ते मला आवडले. त्यात भावना होती, म्हणून ते मी सोशल मीडियावर टाकले, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर चिमटा काढला.

राज ठाकरे यांनी पुलवामा येथील घटनेवर भाष्य केले होते. त्यात त्यांनी पुलवामा हत्याकांड आधी राष्ट्रीय सल्लागार आणि पाकिस्तान सल्लागार यांच्यात गुप्त बैठक झाली आणि नंतर हल्ला झाला का? असा प्रश्न उपस्थितीत केला होता, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली. (Sanjay Raut On Raj Thackeray News )

Raj Thackeray, Sanjay Raut.
Beed Lok Sabha Election 2024 : बजरंग सोनवणेंनी सोडली दादांची साथ..., काकांचा धरणार हात

संभाजीनगर येथे पत्रकारांनी राऊत यांना राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाबद्दल प्रश्न विचारला, यावर त्यांनी राज ठाकरे यांनी आतापर्यंत बदललेल्या भूमिकेचा दाखला देत टीका केली. याशिवाय राज्यातील विविध राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. शाहू महाराज यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने कोल्हापूर येथे जाऊन मोठ्या महाराजांना भेटणार आहोत. त्यानंतर सांगली येथे जाऊन वसंतदादा यांना श्रद्धांजली वाहून मिरजमध्ये जाणार आहोत. आमचे दौरे सुरू आहेत, आम्ही थांबणार नाही.

आगामी काळात महाविकास आघाडीच्या सभा होतील, त्यानिमित्ताने आम्ही शरद पवार यांची भेट घेणार आहोत. वंचितने सोबत यावे, राजू शेट्टी यांनी सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. शाहू महाराज अपक्ष लढणार नाहीत, ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. ते आदरणीय आहेत, म्हणून उद्धव ठाकरे भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊ, असे संजय राऊत यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत.....

वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे नेहमी कोडी टाकतात. प्रकाश आंबेडकर यांचा कायम सन्मान करतो, आमच्यात लढण्याची हिंमत आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष संविधान नष्ट करू पाहणाऱ्या सोबत जाणार नाहीत. आम्ही 25 वर्षे भाजपसोबत होतो. पण आता कोणताही स्वाभिमानी माणूस त्यांच्या सोबत जाणार नाही. महाराष्ट्रातील सामाजिक घटक ईडी आणि सीबीआयला घाबरून सोबत येत नाही, असे राऊत यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेत कुठलाही वाद नाही. चंद्रकांत खैरे (Chhandrkant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उमेदवारी मागितली आहे. आमच्याकडे अनेक ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी तीन-चार जण स्पर्धेत आहे. हे चांगले चित्र आहे. अंबादास दानवे यांच्याकडे राज्यातील पक्षाचे सर्वात मोठे पद आहे. राज्यभर दौरे करून ते सरकारला घाम फोडत आहेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Raj Thackeray, Sanjay Raut.
MP Sanjay Raut News : संजय राऊत म्हणतात, ती यादी खरी नाही...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com