Marathwada : मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा ३८ वा वर्धापनदिन आज छत्रपती संभाजीनगरात साजरा करण्यात आला. यासाठी मुंबईहून शिवसेना नेते खासदार संजय राऊत आले होते. (Sanjay Raut Upset News) संत एकनाथ नाट्यगृहात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पण ऐरवी खचून भरणारे नाट्यगृह आणि त्याची गॅलरी रिकामी होती. हे दृष्य पाहून नाराज झालेल्या संजय राऊत यांनी स्थानिक नेत्यांना सुनावले.
शिवसैनिकांचा मेळावा आहे, पण इथे फक्त पदाधिकारीच दिसतायेत, याआधी गॅलरी रिकामी आहे असे चित्र कधी दिसले नव्हते. सामान्य शिवसैनिकांपर्यत निरोप का गेले नाहीत? याचे आत्मचिंतन करा, अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खंत व्यक्त केली. मराठवाड्यातील पहिल्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वर्धापनदिना निमित्त आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. (Aurangabad) संत एकनाथ नाट्यगृह तुडूंब भरले होते मात्र वरच्या भागात असलेली गॅलरी रिकामी होती.
भाषणात याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, शिवसेनेच्या कार्यक्रमाला गॅलरी कधीच रिकामी दिसायची नाही, मात्र आज गॅलरी रिकामी दिसते आहे. हा मेळावा सर्वांचाच आहे, मात्र इथे पदाधिकारीच दिसत आहेत. मी परखडपणे बोलत आहे, का निरोप गेले नाहीत याचे नेत्यांनी आत्मचिंतन करावे. (Shivsena) शिवसेनेचा इतिहास तर सर्वश्रृत आहे. इतिहासाचे स्मरण करताना आपल्या ताब्यात किती भुगोल आहे यासाठी भुगोलाचाही अभ्यास केला पाहिजे.
आपसातील जळमटे दूर करून प्रत्येकाने आपले उद्दीष्ट, ध्येय फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना हेच ठेवले पाहिजे असे आवाहन राऊत यांनी केले. एक सुर्य, एक चंद्र अन् एक शिवसेना म्हणुन जसे चंद्र, सुर्य दूसरे असू शकत नाहीत तसेच शिवसेनाही दूसरी असूच शकत नाही. म्हणून जे गद्दारी करून निघून गेले आहेत ते पुन्हा निवडून येवू नयेत हेच आपले ध्येय असले पाहिजे.
शिवसेनाप्रमुखांनी एक पक्ष किंवा संघटना दिली नाही तर एक विचार आपल्याला दिला आहे. शिवसेनेचा धगधगता इतिहास आहे म्हणुन मराठवाड्यात ३८ वा वर्धापन दिन आपण सजारा करत आहोत. गद्दार निघून गेले असले तरी उदयसिंग राजपुतसारखे निष्ठावान आहेत. जे शिवसेना सोडून गेले ते राजकारणात, समाजात नंतर दिसलेच नाहीत हा इतिहास आहे. खोकेवाले गेले मात्र खोकेवाल्यांना बडवणारे आमच्याकडे आहेत, असे सांगत राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
राज्यात खऱ्या अर्थाने सध्या मोगलांचे राज्य सुरू असल्याची टिका करतांनाच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फौजदाराचे शिपाई करण्यात आल्याचा टोला लगावला. भविष्यात राज्यात शिवसेनाच एक नंबरचा पक्ष राहिल. महाराष्ट्रातील शिवशाहीच्या रथाचे प्रमुख घोडे मराठवाड्याचे असतील यासाठी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करा.
संघटना वाढली पाहिजे, टिकली पाहिजे हा विचार पुढे घेवून जा, महाभारतात कौरवांचा जसा सूड घेतला गेला तसा सूड आपणा सर्वांना महाराष्ट्रात घ्यायचा आहे. भाजपने पक्षप्रमुखांना अपमानास्पद पद्धतीने मुख्यमंत्रीपदावरून दूर केले याचा कदापी विसर पडू देवू नका, असे आवाहनही राऊत यांनी शिवसैनिकांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.