Maharashtra Assembly Election 2024 : मी गेली पंधरा वर्ष मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांची कामे केली आहेत. नागरिकांना चांगले रस्ते, वीज, आरोग्य सुविधा आणि स्वच्छ पाणी पुरवण्यावर माझा कायम भर राहिला आहे. मी जनतेची काम करणारा आमदार आहे. लोकांशी असलेली माझी नाळ कायम आहे, ती कधीही तुटणार नाही. माझ्या पाठीशी लोकांचे आशिर्वाद असल्याने मला कुणाचीही भिती नाही, अशा शब्दात औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पश्चिमचे महायुतीचे उमेदवार आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले.
मी जनतेचे कामे करणारा आमदार असून, लोकांचे आशीर्वाद आज माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मला कसली ही भीती नाही, माझी या सर्व सामान्य जनतेशी नाळ कायम आहे ती अशी सुटणार नाही. (Sanjay Shirsat) आपण कधी गलिच्छ राजकारण करीत नाही तर विकासाचे राजकारण करतो. आपण युवकांचे रोजगार हिसकावून घेणारा नाही तर युवकांना रोजगार देणारे आमदार आहोत. जनतेची विकास कामे हीच आपली ओळख असून, त्यामुळे मला चिंता नाही हीच जनता सुज्ञ आहे, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या प्रचारार्थ जवाहर कॉलनी येथील विष्णूनगर भागात प्रचार फेरी काढण्यात आली आणि कॉर्नर मीटिंगही घेण्यात आली. जवाहर कॉलनी भागातील महिलांनी औक्षण केल्यानंतर फेरी काढली. यावेळी आमदार शिरसाट म्हणाले, `मी जनतेचे कामे करणारा आमदार असून, लोकांचे आशीर्वाद आज माझ्या सोबत आहेत. त्यामुळे मला कसली ही भीती नाही, माझी या सर्व सामान्य जनतेशी नाळ कायम आहे ती अशी सुटणार नाही.
आपण कधी गलिच्छ राजकारण करीत नाही तर विकासाचे राजकारण करतो. आपण युवकांचे रोजगार हिसकावून घेणारा नाही तर युवकांना रोजगार देणारे आमदार आहोत. जनतेची विकास कामे हीच आपली ओळख असून, त्यामुळे मला चिंता नाही हीच जनता सुज्ञ आहे`, असेही शिरसाट म्हणाले. (Shivsena) यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले, ‘‘आमदार शिरसाट यांनी पश्चिम विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली.
संपूर्ण जवाहर कॉलनी परिसरामध्येही अनेक विकासकामे शिरसाट यांच्या माध्यमातून झाली.’’ माजी नगरसेविका अंकिता विधाते म्हणाल्या, ‘‘विकास कामे करतो तोच आमदार आपल्याला निवडून द्यायचा. विरोधकांच्या आमिषाला बळी पडू नका.
याप्रसंगी उपशहरप्रमुख राजेश जंगले, प्रदीप गुणवानी, जालिंदर शेंडगे, नगरसेविका अंकिता विधाते, अनिल विधाते, पुखराज काळे, सुनील सोनवणे, अजय दहिफळे, तुकाराम भरांडे, माजी नगरसेविका शोभा काळे, विकी साळवे, राज जावळे यांच्यासह शिवसेना, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथेही प्रचार रॅली झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.