Sanjay Shirsat On Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण दिले, आता विरोधकांनी कोल्हेकुई थांबवावी

Political News : ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यापासून अनेकांना पोटशूळ उठला आहे.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Chhatrpati Sambhajingar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले. हा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यापासून विरोधकांसह अनेकांना पोटशूळ उठला आहे. समाजा-समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, अशी वक्तव्ये त्यांच्याकडून केली जात आहेत. परंतु त्यांच्या अशा चिथावणीला कोणीही बळी पडणार नाही, राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यामुळे विरोधात बोलणाऱ्यांनी आपली कोल्हेकुई थांबवावी, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांना सुनावले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, शिंदे सरकारला ते अडचणीचे ठरावे, यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले होते. या आरक्षणामुळे सरकार जाते की काय? या आनंदात असलेल्यांना यामुळे धक्का बसला आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वेशीवरच मान्य केल्या. एवढेच नाही तर त्याचा अध्यादेशच मनोज जरांगे-पाटील यांच्या हाती सोपवत दिलेला शब्द पूर्ण केला.

Sanjay Shirsat
Pratap Chikhlikar : खासदार चिखलीकर दोन पावलं मागे; पक्षांतर्गत विरोधकांना शांत करण्यात यशस्वी...

राज्यात मराठा आरक्षणाच्या अधिसूचना, अध्यादेशानंतर ओबीसी नेते, तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाबाबत चांगला निर्णय घेतल्यानंतर मराठा समाजाने केलेला जल्लोष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र, आता हे आनंदाचे वातावरण बिघडवण्याचे काम काही लोक करीत आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे ज्यांना वाटत होते. त्यांनी आतापर्यंत याबाबत तोंडही उघडलेलं नाही. त्यांना माहीत आहे की, आता जर आपण आरक्षणाच्या विरोधात बोललो तर महागात पडेल. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे. तरीही काही लोकांकडून आरक्षणाचं भांडवल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण त्यांचे हे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्व समाजाची बैठक मुख्यमंत्री घेणार

मराठा समजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यानुसार सरकार सर्वांना कुणबी प्रमाणपत्र वितरीत करून आरक्षणाचा लाभ देणार आहे. सरकारची अशी स्पष्ट भूमिका असताना अनेकांची कोल्हेकुई सुरूच आहे. समाजा-समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, अशी वक्तव्ये केली जात आहेत. लवकरच पुढील आठवड्यात सर्व समाजाची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत. ज्यांच्या अडचणी असतील त्यावर उपाय काढण्याचे काम सरकार करेल, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

सरकार विरोधात राजकीय जोडे काढून बोलावे

सरकारमध्ये असताना सरकार जी भूमिका घेते त्याचे समर्थन करायला हवे. याबाबत चर्चा करायची ठरल्यास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कॅबिनेटमध्ये करावी. त्यांनी ऐकलं तर ठिक नाही तर आपापले निर्णय घ्यावेत. एकीकडे सरकारची भूमिका, दुसरीकडे तुमची वेगळी भूमिका यामुळे गल्लत होते. त्यामुळे सरकारवर आरोप-प्रत्यारोप होतात, म्हणून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कोणतेही विधान करू नये. सरकारच्या विरोधात बोलायचे असल्यास राजकीय जोडे काढून बोलावे, असा सल्ला संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांनी छगन भुजबळांना नाव न घेता दिला.

(Edited By Sachin Waghmare)

R...

Sanjay Shirsat
Sanjay Shirsat News : शिरसाटांचा मोठा दावा; ठाकरेंची शिल्लक सेनाही लवकरच आमच्याकडे येईल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com