Sanjay Shirsat : मर्सिडीजमधून फिरणारे संजय शिरसाट शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी ट्रॅक्टरने बांधावर गेले!

Sanjay Shirsat went by tractor to inspect the damage agriculture :कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संजय शिरसाट यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी केली.
Guardian Minister Sanjay Shirsat Visit Farm News
Guardian Minister Sanjay Shirsat Visit Farm NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसानीची पाहणी करण्यासाठी मर्सिडीजऐवजी ट्रॅक्टरची सवारी केली.

  2. शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन संवाद साधत त्यांच्या समस्यांची माहिती घेतली.

  3. हा अनोखा दौरा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Heavy Rain affected Farm News : राज्याचे सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे वेगळेच रुप आज पहायला मिळाले. मंत्रीपदाचा रुबाब, अलिशान गाडीतला प्रवास, मागे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गराडा या वातावरणात सातत्याने वावरणारे संजय शिरसाट आज शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टरने गेले.

अतिवृष्टीने (Heavy Rainfall) यंदा मराठवाड्याला चांगलेच झोडपले आहे. विशेषतः नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यात तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे जे नुकसान झाले त्याची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

पैठण तालुक्यातील कातपूर, ढोरकीन, मुधळवाडी येथे पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भेटी देऊन तेथील शेतीचे झालेले नुकसान पाहिले. शेती खरडून निघाली, पीकं वाहून गेली, जनावरे दगावली असे भीषण चित्र सर्वत्र पहायला मिळाले. पायी देखील चालता येणार नाही अशी परिस्थिती अनेक भागात होती. एरवी मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्या संजय शिरसाट यांनाही काही शेताच्या बांधावर जाण्यासाठी ट्रॅकटरचा आधार घ्यावा लागला.

Guardian Minister Sanjay Shirsat Visit Farm News
Ncp : अतिवृष्टी, पुराने शेतकरी, नागरिक हैराण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र वाटाघाटीत दंग

पाऊस सुरू असल्याने डोक्यावर छत्री आणि ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये उभं राहून संजय शिरसाट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. तिथूनच त्यांनी कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोनाफोनी करून तातडीने पंचनामे आणि शेतकऱ्यांना मदतीच्या सूचना दिल्या. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संजय शिरसाट यांनी मराठवाड्यासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती व शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांनी जिल्ह्याचा दौरा केला.

Guardian Minister Sanjay Shirsat Visit Farm News
Sanjay Shirsat News : डीजे नको, बॅन्ड वाजवा ; पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच! संजय शिरसाट यांचा नेमका टोला कोणाला?

शिरसाटांची चर्चा..

संजय शिरसाट हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. कधी वाद, आरोप किंवा त्यांच्या विधानामुळे ते कायम चर्चेत राहिले. राजकीय विरोधकांनी त्यांना घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरसाट यांची कायमच पाठराखण केली. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना न जुमानता संजय शिरसाट आपल्या पद्धतीने राज्यात आणि जिल्ह्यात काम करतांना दिसत आहेत.

ट्रॅक्टरमध्ये बसून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर याचीही चर्चा होऊ लागली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा लवकरच घेणार आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते.

FAQs

प्र.1. संजय शिरसाट शेतावर कशासाठी गेले होते?
➡️ अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान पाहण्यासाठी.

प्र.2. त्यांनी मर्सिडीजऐवजी ट्रॅक्टर का वापरला?
➡️ शेतकऱ्यांमध्ये मिसळून त्यांची परिस्थिती जवळून पाहण्यासाठी.

प्र.3. या दौऱ्यावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय होती?
➡️ शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या थेट मांडल्या.

प्र.4. दौऱ्याचा उद्देश काय होता?
➡️ पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी करणे

प्र.5. हा दौरा सोशल मीडियावर का चर्चेत आला?
➡️ कारण मंत्री लक्झरी कारऐवजी ट्रॅक्टरने शेतात पोहचले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com