Sanjay Shirsat News : डीजे नको, बॅन्ड वाजवा ; पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच! संजय शिरसाट यांचा नेमका टोला कोणाला?

Sanjay Shirsat quipped, “No DJ, play the band; if money falls short, my bag is open : पोलीस आयुक्तालयातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीत अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला संजय शिरसाट यांना डिवचले होते.
Shivsena Minister Sanjay Shirsat News
Shivsena Minister Sanjay Shirsat NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाचा गणेशोत्सव हा डीजे मुक्त व्हावा, असा प्रयत्न सामाजिक संस्था, पोलीस, जिल्हा प्रशासन आणि राजकीय मंडळींकडून सुरू आहे. याच संदर्भात छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात एक बैठक पार पडली. अर्थात या बैठकीला सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री उपस्थित होते. सगळ्यांनीच डीजे नको, बॅन्ड वाजवा, असा सूर लावला. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यातही विरोधकांना टोला लगावण्याची संधी शोधलीच.

कशाला हवेत डीजे, चाळीसगावाच, वैजापूरचा बॅन्ड बोलवा, पैशाची काही कमी नाही, कमी पडले तर हे आहेत इथे बसलेले असे म्हणत त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनाच चिमटा काढला. नाहीतर मी आहेच, आपली बॅग उघडीच आहे, अशा शब्दात विरोधकांची विकेटच काढली. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते. महिनाभरापूर्वी संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा त्यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्हायरल केला होता.

यामध्ये संजय शिरसाट हे बनियन चड्डीवर आपल्या घरातील बेडवर बसलेले होते. सिगारेटचा झुरका आणि फोनवर बोलत असताना त्यांच्या शेजारी नोटांनी भरलेली उघडी बॅग या व्हिडिओमध्ये दिसत होती. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह इतर विरोधी पक्षांनी संजय शिरसाट यांना लक्ष्य केले होते. अंबादास दानवे (Ambadas Danve) हे देखील त्यात आघाडीवर होते. यावर बराच राजकीय गदारोळ झाला. शिरसाट यांनी यावर स्पष्टीकरणही दिले. राज्यात हा विषय चांगला गाजला. पण या प्रकणातून सहीसलामत बाहेर पडल्यानंतर शिरसाट हाच मुद्दा विरोधकांना डिवचण्यासाठी वापरताना दिसत आहेत.

Shivsena Minister Sanjay Shirsat News
Ambadas Danve On Devendra Fadnavis : देवेंद्रजी बाळासाहेबांनी आदरातिथ्य परंपरा जपली, ते न बोलावता पाकिस्तानात पंतप्रधानांचा केक कापायला गेले नव्हते!

पोलीस आयुक्तालयातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीत अंबादास दानवे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला संजय शिरसाट यांना डिवचले होते. नुकताच त्यांना एका खासगी संस्थेचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला. त्यामुळे दानवे यांनी संजय शिरसाट यांचा 'महाराष्ट्र रत्न' असा उपरोधिक उल्लेख केला. एकदा नव्हे तर दोनदा. बैठक संपल्यानंतरही दानवे यांनी ते महाराष्ट्र रत्न कसे हे सांगताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांची जंत्री माध्यमांसमोर मांडली होती.

Shivsena Minister Sanjay Shirsat News
Shivsena News : मुख्यमंत्र्यांसमोरच भुमरे-शिरसाट-दानवे यांच्यात कानगोष्टी! काजू खात तिघांमध्ये हास्यविनोदही रगंला..

एकूणच काय तर कधी एकत्र बसून काजू खाणारे संजय शिरसाट आणि अंबादास दानवे पुन्हा एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत, हे कालच्या बैठकीतून पुन्हा दिसून आले. ज्या नोटांच्या बॅगेमुळे संजय शिरसाट यांची राज्यभरात चर्चा झाली, अर्थात ती वाईट पद्धतीने. परंतु आता त्याच नोटांच्या बॅगेचा विषय संजय शिरसाट हत्यार म्हणून वापर करताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com