

Shivsena News : अशोक खरात याचे कारनामे उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. अनेक राजकारणी या प्रकरणामुळे विरोधकांच्या रडारवर आहेत. याच प्रकरणावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
'राजकारणात वावरताना अनेक लोकांशी संपर्क येतो, पण समोरच्याचे पाप त्याच्या कपाळावर लिहिलेले नसते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबत शेकडो लोक फोटो काढत असतात. त्यातील कोण खुनी, बलात्कारी आहे किंवा कोण काय उद्योग करतो? हे फोटो काढताना माहित नसते. जर केवळ फोटो काढल्यामुळे नेत्यांना राजकारण सोडावे लागणार असेल, तर उद्यापासून नेत्यांना मंत्रालयात बुरखा घालून फिरावे लागेल', असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्ते केले.
आम्ही मंदिर, सप्ताह किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जातो. तिथे चांगल्या भावनेने जातो. पण तिथे जर काही चुकीचे घडत असेल, तर नेत्याला दोष देणे चुकीचे आहे. या प्रकरणामुळे आता सर्वच राजकीय नेते सावध झाले आहेत. खरातने जे काही केले आहे, तो नीचतेचा कळस आहे. या भोंदूबाबावर आता देव कोपला आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अशोक खरातचे कृत्य हे धर्माला लागलेला कलंक असून, त्याचे हाल रामरहीमसारखे झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. खासदार संजय राऊत म्हणतात की, वर्षा बंगल्यावर लिंबू निघाले, जादूटोणा केला. जर जादूटोणा करून मुख्यमंत्री होता आले असते, तर मग लोकांकडे जाण्याची काय गरज होती? हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे हे चालत नाही.
उलट संजय राऊत हेच मोठे जादूगार आहेत, ज्यांनी ठाकरेंची सत्ता पालटली आणि अख्खा पक्षच बुडवून टाकला, असा टोला त्यांनी लगावला. तसेच खरात प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, खरातला मदत करणाऱ्यांवर आणि या प्रकरणात भागीदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ", असेही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.