Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड क्रमांक एकचा आरोपी पण टोळीचा प्रमुख म्हणून दुसऱ्याचं नाव, ही सुटण्याची पळवाट? दमानिया यांचा सवाल

Anjali Damania On CID Investigation Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. ज्यामध्ये खंडणी प्रकरणात आडवे आल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Anjali Damania 1
Anjali Damania 1Sarkarnama
Published on
Updated on

Beed News 03 Mar : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं आहे. ज्यामध्ये खंडणी प्रकरणात आडवे आल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

या दोषारोप पत्रात वाल्मिक कराडचा उल्लेख आरोपी क्रमांक एक म्हणून करण्यात आला आहे. तसंच कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. मात्र, याच दोषारोप पत्रातील एका पानावर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) असं लिहिल्याचं समोर आलं आहे.

Anjali Damania 1
Swargate Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक माहिती; पीडितेनं जबाबात म्हटलंय, आरोपीनं गळा दाबून जीवे मारण्याची धमकी...

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या दोषारोप पत्रातील एका पानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी चार्जशीटमध्ये टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? असं विचारत ही वाल्मिक कराडसाठी सुटण्याची पळवाट आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं, "सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या कालच्या चार्जशीटमध्ये हे कसे आणि का लिहिले गेले? पान ३६ वर “टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले” असे का लिहिले ? तो टोळीचा प्रमुख कसा? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड (Walmik Karad) नंबर १ वर असले, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे.

Anjali Damania 1
Dattatraya Gade: लेडी ब्लॅकमेलर दत्ता गाडे; लॉजबाहेर बसून असं शोधायचा सावज, महिलांचे छुपे व्हिडिओ काढून...

वाल्मिक कराडबद्दल फक्त लिहिण्यात आले की त्यांनी “आता जो कोणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल” असे त्यांनी सुदर्शन घुले यांना सांगितले आणि “कामाला लागा आणि विष्णु चाटेशी बोलून घ्या “ एवढेच चार्जशीटमध्ये लिहिले आहे.

उद्या वाल्मिक कराड म्हणतील, मी कुठे त्यांना मारा असे म्हटले? ही सुटण्याची पळवाट आहे का?", असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित करत वाल्मिक कराडच्या सुटकेचा मार्ग सोप करण्यासाठी हा सर्व खटाटोप चालला आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता यावर देशमुख कुटंबीय काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com