
Mumbai News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पॅटर्न राज्यभर चर्चेत आला. ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन गेल्या महिन्याभरापासून 'अॅक्शन मोड'वर कारवाई करत आहेत.
गुन्हेगारांकडेच पिस्तुलांचे शस्त्र परवाना असल्याने ती रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात 100 आणि आता 83, असे एकूण 183 जणांचे पिस्तूल परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी 127 जणांचे पिस्तूल परवाने रद्द होणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली अन् बीडमधील गुन्हेगारी राज्यसमोर आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप (BJP) आमदार सुरेश, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमधील गुन्हेगारीवर आवाज उठवला. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण नागपूर हिवाळी अधिवेशनात लावून धरले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकून, जिल्ह्यातील गुन्हेगारांवरून बीड (BEED) जिल्हा प्रशासनाला 'सळो की पळो' करून सोडले. बीडमधील पिस्तुलांचा गैरवापराचे व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केले. यामुळे बीडमधील शस्त्र परवानाचे वितरण प्रशासकीय पातळीवरून कसे झाली, याला वाचा फुटली. यानंतर जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवान्यांची छाननी सुरू केली. तसचे अवैध गावठी पिस्तुलांविरोधात बीड पोलिस दलाने पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली.
बीड जिल्ह्यात 1 हजार 281 जणांकडे पिस्तूल वापरण्याचे शस्त्र परवाना होता. यात काही लोक बीडचे रहिवासी असले तरी पुणे आण मुंबईसह इतर शहरांमध्ये वास्तव्यास होते. तसेच काही लोकांवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही, त्यांना परवाना देण्यात आल्याच प्रकार समोर आला. याचाच काही जण दुरूपयोग करत होते. कंबरेला लावून फिरत होते. सण, उत्सवात हवेत गोळीबार करत होते. काही जण व्हिडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकत होते. यातून वेगळीच दहशत निर्माण करत होते.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर गंभीर 15 गुन्हे दाखल असतानाही त्याला शस्त्र परवाना दिला होता. हा सर्व प्रकार अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हा प्रशासनाकडे शस्त्र परवान्यांची छाननी केल्याच्या मागणीवर उघडकीस आला. या छाननीत मयत असलेल्या अनेकांच्या नावावर शस्त्र परवाने असून, तो आकडा 118 च्या पुढे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बीडमधील वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यास पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुरवात केली आहे. 26 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, 51 जणांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत वाळू चोरी थांबवा, अशा सूचना दिल्या. तसेच वाळू चोरी करताना सापडल्यास, 'मकोका' अंतर्गत कारवाईचा इशारा देखील दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.