
Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीने बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात तब्बल 1500 पानी दोषारोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.
सीआयडीच्या तपासानुसार, खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा सहभाग आहे का? हे तपासातून स्पष्ट होईल. या प्रकरणात सात आरोपींनी कशा प्रकारे कट रचला, हत्या केली आणि त्याचा गुन्हेगारी इतिहास काय आहे, यासंबंधी पुरावे चौकशीतून समोर आणले आहेत.
आरोपींनी हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणती? हल्ला कसा झाला? हत्येची वेळ आणि ठिकाण कोणते? हेही दोषारोप पत्रातून उघड होईल. तसेच, आरोपी फरार होण्यात कोणाच्या मदतीने यशस्वी झाले आणि त्यानंतर ते कुठे लपले होते? याचाही तपास करण्यात आला आहे. याशिवाय, कुठल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला? याचाही तपास सीआयडीने केला आहे. त्यामुळे या बाबींचा समावेश दोषारोपपत्रात असण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांमध्ये काही संबंध आहे का? याचाही तपास करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपींचे सुटणे अशक्य मानले जात आहे. दोषारोप पत्रात प्रामुख्यने सात आरोपींनी कट कसा रचला आणि अंमलात आणला, आरोपींच्या सहभागासंदर्भातील डिजिटल पुरावे आणि सीडीआर, हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग वाल्मीक कराड व इतर आरोपींची भूमिका, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा हत्येत सहभाग आहे का? वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीचा तपास आदींचा समावेश देखील दोषारोपपत्रात असण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.