Santosh Deshmukh Murder : मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी संतोष देशमुखांच्या भावाचा मोठा निर्णय; मुंडे, कराडच्या विरोधातील याचिका घेतली मागे

Dhananjay Deshmukh Withdraws Petition : मुंडे आणि कराड यांच्यातील लागेबंध पाहता अपहरण आणि खून प्रकरणाचा तपासात राजकीय दबाव नसावा म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तूर्तास हटविण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
Santosh Deshmukh-Dhananjay Deshmukh
Santosh Deshmukh-Dhananjay DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 January : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या निमित्ताने दररोज नवनवीन घडामोडी पुढे येत आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासाच्या अनुषंगाने धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखली केली होती. बीडमधील राजकीय गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त आहे. त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे कारणीभूत आहेत. मुंडे मंत्रिपदावरून तत्काळ हटविण्यात यावे, त्यानंतरच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होईल, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्याबाबतचे पुरावेही म्हणून फोटोही देण्यात आले होते. तसेच, बीडमधील आमदारांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देण्यात आलेला आहे. कराड आणि मुंडे एकमेकांना मदत करत असल्याचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती.

मुंडे आणि कराड यांच्यातील लागेबंध पाहता अपहरण आणि खून प्रकरणाचा तपासात राजकीय दबाव नसावा म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तूर्तास हटविण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच, वाल्मिक कराड यालाही अटक करण्यात आली आहे, त्यामुळे तपासावर आपण समाधानी आहोत, असे सांगून धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज देशमुख कुटुंबीयांनी वकिलाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com