Beed News : सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या, अवादा कंपनीला खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला मकोकातून दोषमुक्त करावे, या मागणीवर आज मंगळवारी (ता. तीन) सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम व विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी म्हणणे सादर केले. आरोपी पक्षाकडून झालेल्या डिजिटल पुराव्यांच्या मागणीवर बंद लखोट्यात पुरावे न्यायालयाला देणार असल्याचेही सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले.
आजच्या सुनावणीत कुठलेही युक्तिवाद झाले नाहीत. केवळ एकमेकांच्या अर्जांवर दोन्ही पक्षांनी म्हणणे मांडले. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. (walmik karad) आवादा कंपनीला वाल्मिक कराडने मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला अडसर ठरल्याने देशमुख यांची हत्या झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात समोर आले.
तपासात वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार तर विष्णू चाटे दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. यासह सुदर्शन घुले, प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार व फरार कृष्णा आंधळे यांच्यावर खुनाचा ठपका आहे. बीडचे विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. (Beed News) ता. 19 मे रोजी यापूर्वीची सुनावणी पार पडली होती. दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य वाल्मिक कराडची जंगम व स्थावर मालमत्ता जप्तीची मागणी सरकारी पक्षातर्फे न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे.
आज यावर आरोपींच्या वकिलांनी म्हणणे सादर केले. तर, वाल्मिकला मकोकातून दोषमुक्त करावे, या मागणीवरही सरकार पक्षातर्फे म्हणणे सादर करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही अर्जांसह वाल्मिक कराडसह इतर आरोपींवर दोषनिश्चिती, युक्तिवादाबाबतच्या अर्जांवर पुढच्या सुनावणीवेळी निर्णय होणार आहे.
त्यानंतर युक्तिवादाच्या तारखा निश्चित होणार असल्याची माहिती, विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांनी दिली. आजच्या सुनावणीत कुठलेही युक्तिवाद झाले नाहीत. केवळ एकमेकांच्या अर्जांवर दोन्ही पक्षांनी म्हणणे मांडले. आरोपी पक्षांकडून अॅड. मोहन यादव आणि अॅड. विकास खाडे यांनी म्हणणे सादर केले.
त्यावर सरकार पक्षाची हरकत नाही
वाल्मिकच्या मकोकातून दोषमुक्तीच्या अर्जावर अगोदर निर्णय व्हावा आणि नंतर त्याच्यावर दोषनिश्चिती व्हावी, अशी आरोपी पक्षाच्या मागणीवर आमची हरकत नसल्याचे अॅड. निकम यांनी सांगितले. पुढच्या तारखेला केवळ विविध अर्जांची चौकशी होणार असल्याने विशेष सहाय्यक सरकारी वकील अॅड. बाळासाहेब कोल्हे न्यायालयासमोर हजर राहतील, असेही अॅड. निकम यांनी सांगीतले.
नियती माफ करणार नाही : देशमुख
आम्ही न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाला नियती माफ करणार नाही, नियती सर्वांना शिक्षा देईल, असे सुनावणीनंतर धनंजय देशमुख म्हणाले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने जास्त बोलणे उचित नसून सरकार पक्षाचे वकील योग्य बाजू मांडत असल्याचेही देशमुख म्हणाले. आजच्या सुनावणीला त्यांच्यासह वैभवी देशमुख हजर होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.