Harsvardhan Sapkal In Sadbhavana Rally : संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या नावासमोर 'शहीद' असा उल्लेख हवा!

Congress State President Harshvardhan Sapkal demands that Sarpanch Santosh Deshmukh be referred to as a martyr in recognition of his contributions. : काँग्रेस पक्ष या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहणार आहे. दुंभगलेली मने आणि समाजमन जोडण्यासाठी आजची सद्भावना रॅली असल्यचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Harshvardhan Sapkal-Santosh Deshmukh-Sadbhavana Rally News
Harshvardhan Sapkal-Santosh Deshmukh-Sadbhavana Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण खून आणि त्यानंतर समोर आलेलीली छायाचित्रे याने महाराष्ट्र हादरून गेला. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही धडा शिकवावा, अशी मागणी प्रत्येकाकडून केली जात आहे. काँग्रेसने संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि राज्यात, प्रत्येक जाती-धर्मामध्ये सद्भावना जागृ़त व्हावी, या उद्देशाने मस्साजोग ते बीड दरम्यान, आज सद्भावना रॅली काढली.

काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मनाला वेदना देणारी आहे. आरोपींना कठोर शासन तर झाले पाहिजेच, पण संतोष देशमुख यांचे बलिदान पाहता त्यांच्या नावापुढे शहीद असा उल्लेख केला जावा, ही आमची भावना असल्याचे सपकाळ म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी मस्साजोग ते बीड दरम्यान, सद्भावना रॅली काढण्याचे जाहीर केले होते.

त्यानूसार सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ आणि राज्यभरातून आलेल्या काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता सद्भावना रॅली निघाली. सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येने महाराष्ट्र हळहळला होता. आरोपींचे कौर्य पाहून प्रत्येकाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Harshvardhan Sapkal-Santosh Deshmukh-Sadbhavana Rally News
Congress vice president quits : राहुल गांधी मुंबईत असताना विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का ; आता 'या' बड्या नेत्याने सोडला पक्ष!

काँग्रेस पक्ष या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही, त्यांनी यावेळी दिली. दुंभगलेली मने आणि समाजमन जोडण्यासाठी आजची सद्भावना रॅली असल्यचे सपकाळ म्हणाले. हा महाराष्ट्र आपण पुरोगामी, फुले-शाहू- आंबेडकरांचा असल्याचे आपण म्हणतो. मग अशा पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या एखाद्या उमद्या तरुणाची अशा क्रूर पद्धतीने हत्या होत असेल तर सगळ्या समाजाने चिंतन, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

Harshvardhan Sapkal-Santosh Deshmukh-Sadbhavana Rally News
Santosh Deshmukh : फोन ठेवताच पप्पा खूप घाबरलेले...; हत्येच्या आदल्या दिवशी आलेला 'तो' फोन कुणाचा? संतोष देशमुख नेमकं काय बोलले? वैभवीने जबाबात सांगितलं

एखाद्या व्यक्तीमुळे सगळ्या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे ही चुकीचे असल्याचे मत सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केले. भय, द्वेष, मत्सर आणि पैशाची लालसा यातून एवढ्या क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली आहे. मारेकर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य येते तरी कुठून? ही लढाई एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर ती सर्वांना एकत्रितपणे लढावी लागणार आहे, असे आवाहन सपकाळ यांनी केले. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी संतोष देशमुख यांचे बलिदान पाहता, त्यांच्या नावापुढे शहीद असा उल्लेख केला जावा, याचा पुनरुच्चारही सपकाळ यांनी केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com