Congress vice president quits : राहुल गांधी मुंबईत असताना विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का ; आता 'या' बड्या नेत्याने सोडला पक्ष!

Maharashtra Congress News : जाणून घ्या, काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या बड्या नेत्याने कोणत्या पक्षात केला आहे प्रवेश?
Rahul Gandhi congress
Rahul Gandhi congresssarkarnama
Published on
Updated on

Vijay Ambhore resigns: महाराष्ट्रात सातत्याने महाविकास आघाडीतील पक्षांना धक्के बसत आहेत. अनेक नेते पक्ष सोडून सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे खुद्द मुंबईत असताना काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत आज (गुरुवार) प्रवेश केला आहे. मागील आठवड्यातच त्यांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आम्हाला दिलेल्या पदाला पक्षात काही किंमत नाही असा त्यांनी आरोप केला होता.

Rahul Gandhi congress
Mahakumbh Mela terror plot : महाकुंभमेळ्यात दहशतवादी हल्ला घडवण्याच्या प्रयत्नात होता बब्बर खालसाचा दहशतवादी, मात्र...

मागील काही दिवसांपासून काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले होते, मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आलेले अपयश. शिवाय महाराष्ट्राबाहेरही काँग्रेसची सुरू असलेली घसरण. यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नैराश्याचे वातावरणही दिसत आहे.

विजय अंभोरे यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला(Congress) विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गृह जिल्ह्यातच पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Rahul Gandhi congress
Shiv Sena Goa entry : आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही गोव्याकडे वळवला मोर्चा; पक्षविस्तारासाठी राज्यव्यापी मेळावा होणार!

सपकाळ यांनी काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यानंतर आता थेट प्रदेश उपाध्यक्षांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे सपकाळ यांच्यासमोर आता पक्षाला लागलेली गळती थांबवणे हेही मोठे आव्हान असणार आहे. कारण, काही दिवसांआधीच नाशिकमध्येही काँग्रेसला धक्का बसला होता. प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी पक्ष सोडला होता.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com