Satish Bhosale arrested : 'खोक्या'ला मदत करणारे सहआरोपी होणार; पोलिस अधीक्षक नवनीत कावतांनी उचललं मोठं पाऊल

Maharashtra Beed Police Superintendent Navneet Kanwat helping Satish Bhosale co-accused : भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय गुंड सतीश भोसले याला प्रयागराज येथे अटक झाली असून, त्याला मदत करणाऱ्यांना सहआरोपी करणार असल्याचे बीड पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले.
Navneet Kanwat
Navneet Kanwat Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Police news : भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय गुंड सतीश भोसले ऊर्फ 'खोक्या'भाई याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. सतीश भोसले उत्तर प्रदेश पोलिसांकडून हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला बीडमध्ये आणण्यात येईल.

दरम्यान, पसार होण्यासाठी त्याला मदत करणारे आणि गुन्ह्यांमध्ये त्याला सहकार्य करणाऱ्यांना देखील सहआरोपी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.

सतीश भोसले याचे गुन्हे (Crime) बाहेर आल्यापासून त्याच्यावर पोलिसांचा वाॅच होता. त्यामुळे बीड पोलिसांना तो मिळत नाही, शोध लागत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरले. शेवटचे लोकेशन त्याचे प्रयागराज इथं असल्याचे मिळाले, असा पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी केला.

Navneet Kanwat
Ajit Pawar : 'मस्तीच उतरवतो'; अजित पवारांचा धान घोटाळ्यावर अधिकाऱ्यांना इशारा

सतीश भोसले याला उद्या किंवा परवा बीडमध्ये (BEED) आणले जाणार आहे. त्यानंतर त्याच्याशी संबंधित गुन्ह्यांची चौकशीला सुरवात होईल. माध्यमांना भेट होता, पण पोलिसांना भेटत नाही, असे बोलले जात होते. त्यावर नवनीत कावत म्हणाले, असे काही नाही. दोन्ही डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. आमचे पथक त्याच्या मागावरच होते. त्याला रिझर्ल्ट बघितला आहे, असे नवनीत कावत यांनी म्हटले.

Navneet Kanwat
Prashant Kortkar case : प्रशांत कोरटकर 'चतूर', मोबाईलमधील डेटासंदर्भात पोलिसांनी न्यायालयात दिली धक्कादायक माहिती

सतीश भोसले हा बीडमधील कसा पळाला, याची माहिती त्याच्याकडे तपास केल्यानंतर समोर येईल, असे सांगताना त्याला यात ज्यांनी कोणी मदत केली आहे, त्यांना सहआरोपी करणार असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले.

गुंड सतीश भोसले याच्यावर दोन गुन्हे शिरूर कासार पोलिस ठाण्यात, एक गुन्हा चकलांबा पोलिस ठाणे आणि एक वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. यात बीड पोलिसांकडे दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांपैकी दोन गु्न्हे 307 कलमानुसार, तिसरा गुन्हा एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार दाखल आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com